Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:58 IST

सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कुर्ला-बीकेसी-वांद्रे भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात वांद्रे रेल्वेस्थानक ते उत्पादन शुल्क विभाग कार्यालय हा भाग एक आणि कुर्ला रेल्वेस्थानक ते भारत डायमंड बोर्स असा भाग २ मार्ग उभारला जाणार आहे. मात्र, वांद्रे रेल्वेस्थानक ते कुर्ला रेल्वेस्थानक अशा संपूर्ण मार्गासाठी २०३१ पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एमएमआरडीएकडून पॉड टॅक्सी प्रकल्पाची सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी हैदराबाद येथील साई ग्रीन मोबिलिटी या कंपनीला १ हजार १६ कोटी रुपयांना कंत्राट देण्यात आले आहे. त्यातून पहिल्या टप्प्यातील मार्गावर पुढील २० महिन्यांमध्ये म्हणजेच २०२७ च्या अखेरीस पॉड टॅक्सी धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • ८.८ कि.मी. - पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी
  • मार्ग - कुर्ला रेल्वेस्थानक ते वांद्रे रेल्वेस्थानक
  • ४० कि.मी. प्रतितास - पॉड टॅक्सीचा वेग
  • दर १५ सेकंदांच्या अंतराने धावणार
  • ६ - पॉड टॅक्सीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 
  • २१ रुपये प्रति किमी प्रवासी दर
  • पहिल्या टप्प्यातील मार्ग
  • पहिला टप्पा : लांबी ३.३६ किमी
  • स्थानके - ८

भाग १ स्थानके - कुर्ला रेल्वेस्टेशन, एलबीएस रोड, एमएमआरडीए पे अँड पार्क डायमंड बोर्स भाग २ स्थानके - वांद्रे टर्मिनल, कलानगर, ऑडिट भवन, एमएमआरडीए कार्यालय 

पॉड टॅक्सी का?

बीकेसीतील विविध कार्यालयांमध्ये सुमारे ४ ते ६ लोक दरदिवशी येतात. त्यातून बीकेसीत नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी, सद्य:स्थितीत बीकेसीतील एमटीएनएल जंक्शनपासून कुर्ला स्थानक गाठण्यासाठी कारला १६ मिनिटे, तर बसला २४ मिनिटे लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान पॉड टॅक्सी प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

  • पॉड टॅक्सीची स्थानके एकमेकांपासून सुमारे २०० मीटर अंतरावर असतील. 
  • एआय आधारित, चालकविरहित ऑपरेटिंग तंत्रज्ञान.
  • प्रत्येक पॉडमध्ये ६ प्रवासी असतील.
  • प्रत्येक पॉड ३.९ मीटर लांब, २.०१ मीटर रुंद आणि १.८ मीटर उंच आणि वातानुकूलित असतील. 
  • २०३१ पर्यंत दररोज १.०९ लाख प्रवासी प्रवास करू शकतील.
English
हिंदी सारांश
Web Title : Pod Taxi Groundbreaking: Kurla-Bandra travel awaits 2031 completion.

Web Summary : Mumbai's first pod taxi project breaks ground, aiming to ease Kurla-Bandra traffic. Phase one completion is expected by 2027. The full Kurla-Bandra route won't be ready until 2031. The pod taxis, with 6-passenger capacity, will run every 15 seconds.
टॅग्स :मुंबईकुर्ला