शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त गिरगाव शाहु स्मृतीस्तंभावर अभिवादन ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:25 PM2024-05-06T20:25:54+5:302024-05-06T20:26:14+5:30

मुंबई महापालिका आणि शाहू स्मारक समितीच्या पुढाकाराने शाहूमहाराजांचे मुंबईतील निधनस्थळ गिरगाव, १३ वी गल्ली खेतवाडी येथे शाहु स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे. सोमवारी महापालिका 'डी' प्रभाग कर्मचारी, शाहू स्मारक समिती, मुंबई आणि  सामाजिक संस्था- संघटनांनी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले. 

Greetings at Girgaon Shahu Memorial on the occasion of Shahu Maharaj's Memorial Day | शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त गिरगाव शाहु स्मृतीस्तंभावर अभिवादन ! 

शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त गिरगाव शाहु स्मृतीस्तंभावर अभिवादन ! 

श्रीकांत जाधव

मुंबई :  लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील गिरगाव, खेतवाडी येथील शाहु स्मृती स्तंभावर सामाजिक संस्था- संघटनांनी पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांच्या कार्याची महती तसेच कृतज्ञता व्यक्त करीत अभिवादन केले. यावेळी मोठया संख्येने शाहुप्रेमींनी गर्दी केली होती. 

मुंबई महापालिका आणि शाहू स्मारक समितीच्या पुढाकाराने शाहूमहाराजांचे मुंबईतील निधनस्थळ गिरगाव, १३ वी गल्ली खेतवाडी येथे शाहु स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे. सोमवारी महापालिका 'डी' प्रभाग कर्मचारी, शाहू स्मारक समिती, मुंबई आणि  सामाजिक संस्था- संघटनांनी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले. 

यावेळी एसीपी रवी सरदेसाई, आयकर अधिकारी आनंद फगरे, निवृत आयकर अधीक्षक गणपत जाधव, चित्रपट दिग्दर्शक सतिश रणदिवे, शाहू स्मारक समितीच्या मुंबई संघटक प्रज्ञा जाधव, पैलवान संग्राम कांबळे, स्वाती गजरे, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले. 

खेतवाडी येथील स्मृतिस्तंभ शाहू स्मारक समिती व मुंबई पालिकेने पुढाकार घेऊन उभारल्यानंतर दरवर्षी स्मृतिदिनी आणि जयंतीला शाहूप्रेमी स्वयंप्रेरणेने व जाणिवेने येथे उपस्थितीत लावत आहेत. 

Web Title: Greetings at Girgaon Shahu Memorial on the occasion of Shahu Maharaj's Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.