Greater Mumbai Ganeshotsav coordination committee released rules for the Ganesh visarjan sh | गणेश विसर्जनासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने प्रसिद्ध केली नियमावली 
गणेश विसर्जनासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने प्रसिद्ध केली नियमावली 

मुंबई - मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, आठवडाभर सुरू असलेल्या उत्सवाच्या धामधुमीनंतर आता गणेशभक्तांना बाप्पांच्या विसर्जनाचे वेध लागले आहेत. यावर्षी मुंबईत गणपतींचे शिस्तबद्धतेने विसर्जन व्हावे यासाठी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने विसर्जनासाठी प्राथमिक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार  बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे विसर्जनासाठी प्राथमिक नियमावली पुढीलप्रमाणे आहे

- समुद्रात गणेशमूर्तीचे विसर्जन ओहोटीच्याच वेळेत करा

- गणेशमूर्ती नेणारे मोठे वाहन वा व्हिल सुस्थितीत आहे का पाहावे 

-  गणेशमूर्ती नेणाऱ्या मोठे वाहनांच्या चालकांनी कुठलेही व्यसन करू नये

- उंच गणेशमूर्तींबाबत मार्गातील उड्डाणपूल , मेट्रोकामे हे तपासून मिरवणूकीचा मार्ग निश्चित करावा

 - कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करतच निश्चित मार्गावरून मिरवणूकींचे मार्गक्रमण करावे 

- चौपाटी व विसर्जनाच्या ठिकाणी मूर्तीचे वाहन, तसेच अति आवश्यक वाहने वगळता इतर वाहने नेऊ नयेत

-  मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायरला स्पर्श होणार याची खबरदारी घ्यावी

- खोल पाण्यात उतरू नये 

- मूर्ती विसर्जनाकरिता पालिकेकडून केलेली व्यवस्था ही निःशुल्क असते. त्यामुळे कोणीही पैशांची मागणी केल्यास ती पूर्ण करू नये 

Web Title: Greater Mumbai Ganeshotsav coordination committee released rules for the Ganesh visarjan sh

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.