Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादरसह ग्रँट रोड, चर्नी रोड, महालक्ष्मी स्थानकांचा होणार आता पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 10:37 IST

मार्च २०२२ पूर्वी काम सुरू होणे अपेक्षित, पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,   दादर स्थानकावर एकमेकांशी जोडले गेलेले अनेक फूट ओव्हरब्रिज (FoB) आहेत तसेच  यामुळे स्टेशन कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी  ग्रँट रोड, चर्नी रोड, महालक्ष्मी आणि दादर स्थानकांचा पुनर्विकास करणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मार्च २०२२ पूर्वी काम सुरू होणे अपेक्षित आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,   दादर स्थानकावर एकमेकांशी जोडले गेलेले अनेक फूट ओव्हरब्रिज (FoB) आहेत तसेच  यामुळे स्टेशन कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. चर्चगेट येथील जुने बीएमसी एफओबी यांचीदेखील पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच दक्षिणेकडील जुनी, तिकीट बुकिंग कार्यालये आधीच पाडण्यात आली आहेत. दादर येथील नवीन स्टेशन इमारतींमध्ये ही कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. यासाठी आरखडा तयार करण्यात आला आहे  आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महालक्ष्मी येथे जीर्ण झालेल्या एलिव्हेटेड बुकिंग ऑफिसचे नूतनीकरण केले जाणार आहे. या योजनेचा एक भाग म्हणून नवीन स्थानकाची इमारतही उभारण्यात येणार आहे. पालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्वतंत्रपणे जुन्या महालक्ष्मी रोड पुलाची केबल-स्टेड ब्रिजसह पुनर्बांधणी करणार आहे. या स्थानकासाठी असणारा आराखडा  मुख्य कार्यालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

चर्चगेट येथील जुने बीएमसी एफओबी यांचीदेखील पुनर्बांधणी केली जाणार आहे. दक्षिणेकडील जुनी, तिकीट बुकिंग कार्यालये आधीच पाडण्यात आली आहेत. 

दादर येथील नवीन स्टेशन इमारतींमध्ये ही कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. यासाठी आरखडा तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वेलोकल