‘आजोबा आम्हाला बॅड टच करतात’, ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:58 IST2017-10-08T03:58:34+5:302017-10-08T03:58:44+5:30

नऊ वर्षांच्या दोघा बालिकांना खेळण्यासाठी घरी बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणा-या कांदिवलीतील एका ७२ वर्षांच्या वृद्धाला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अँथोनी पास्कल डिसोझा असे त्याचे नाव आहे.

'Grandfather ties us the bat', 'Poxos' filed under the crime | ‘आजोबा आम्हाला बॅड टच करतात’, ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल

‘आजोबा आम्हाला बॅड टच करतात’, ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल

मुंबई : नऊ वर्षांच्या दोघा बालिकांना खेळण्यासाठी घरी बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणा-या कांदिवलीतील एका ७२ वर्षांच्या वृद्धाला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. अँथोनी पास्कल डिसोझा असे त्याचे नाव आहे.
पीडित बालिकांनी ‘आजोबा आम्हाला बॅड टच करतात,’ असे पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांच्या वतीने मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये राबविल्या जात असलेल्या ‘पोलीस दीदी’ कार्यक्रमामुळे त्या मुलींना आपल्याशी होत असलेल्या गैरकृत्याची कल्पना आली.
कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात दोन्ही मुली शेजारी शेजारी राहत असून, त्यांच्या परिसरातच अँथोनी डिसोझा राहतात. त्यांचीही नात या दोघींच्या वयाची आहे. त्यांनी एक कुत्रा पाळलेला आहे. त्याच्याबरोबर खेळण्यासाठी त्या घरी जायच्या. त्या वेळी डिसोझा खेळण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी अश्लील स्पर्श करीत असत. मुलींच्या शाळेत पोलिसांकडून ‘बॅड टच, गूड टच’बाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. पालकांना सांगितल्यावर त्यांनी समतानगर पोलिसांकडे तक्रार केली. डिसोझाविरुद्ध ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.

Web Title: 'Grandfather ties us the bat', 'Poxos' filed under the crime

टॅग्स :Crimeगुन्हा