Join us
Daily Top 2Weekly Top 5

पदवी मिळाली; पण आज ‘ती’ हवी होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 05:27 IST

भावाने व्यक्त केली खंत : पाच महिन्यांपूर्वी बहिणीचा अपघाती मृत्यू

मुंबई : आपल्या भावाच्या पदवीदान सोहळ्याला जात असताना २४ मार्च २०१८ रोजी मरीनड्राइव्ह येथे दिपाली लहामटे हिचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिपालीने सहा दिवसांशी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, ३१ मार्च रोजी तिचे निधन झाले. आता अपघाताच्या पाच महिन्यानंतर शुक्रवारी नायर दंत रुग्णालयात पदवीदान सोहळा पार पडला.

या सोहळ्यात बॅचलर आॅफ डेंटल सर्जरी ही तिची पदवी स्विकारण्यासाठी तिचा भाऊ आणि बहिणीने हजेरी लावली होती. तिच्या पदवीचीघोषणा होत असताना एका क्षणासाठी तिचा संपूर्ण जीवनप्रवास डोळ्यांसमोर समोरुन गेल्याचे तिचा भाऊ डॉ. अभिनय लहामटे याने सांगितले. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी लहामटे कुटुंबियांच्या मनातून कधीच पुसल्या जाणार नाहीत. मात्र शुक्रवारी तिच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉ. सारिका लहामटे आणि डॉ. अभिनय लहामटे या भावा -बहिणींनी हजेरी लावली. दिपालीची मोठी ताई डॉ. सारिका यांनी या तिची पदवी स्विकारली. या सोहळ्यांविषयी सांगताना डॉ. अभिनय याने सांगितले की, स्वप्न पूर्ण होताना पाहायला ती हवी होती. तिची उणीव कायम भासतेच. तिने माझ्यासाठी पदवीदान सोहळ््याला गिफ्ट तयार केले होते. तसेच गिफ्ट तयार करण्याची संधी मलाही हवी होती. पण ती नव्हती, तिच्या सर्व बॅचमेट्सनेही तिची खूप आठवण काढली.असा झाला होता अपघात...मरीनलाइन्स येथील जिमखान्यात भावाच्या पदवीदान सोहळ््याला जात असताना २४ मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता मरीन ड्राइव्ह येथील सिग्नलवर शिखा झवेरी यांच्या भरधाव कारने डॉ. दीपाली या गंभीर जखमी झाल्या होत्या. नायर दंत रुग्णालयात दीपाली इंटर्न म्हणून काम करत होती. तिच्या भावाने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र जिमखान्यात जाण्यापूर्वीच तिचा अपघात झाला आणि मग त्यातच सहा तिचा मृत्यू ओढावला.ती असायला हवी होती..पाच वर्षांच्या मेहनतीचे फळ आज मिळाले. प्रचंड मेहनत, रात्रंदिवस काम करणारी दिपाली आज स्वप्न पूर्ण होताना हवी होती. आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी या इंटर्नशीपच्या काळात अनेक चढउतार पाहिले, त्यामुळे तिची कमी आजच्या सोहळ््यात सारखी भासत होती.- डॉ. मनिष पद्मणे, दिपालीचा बॅचमेट.

टॅग्स :मृत्यूमुंबई