धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत सरकारचा लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:11 IST2020-08-18T05:10:54+5:302020-08-18T05:11:28+5:30

मुंबईतील धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.

Government's decision to start religious places soon | धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत सरकारचा लवकरच निर्णय

धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत सरकारचा लवकरच निर्णय

मुंबई : मुंबईतील धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहे. मुंबईतील मशिदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात सोमवारी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी ‘फर्ज’ नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरातील अनलॉकच्या प्रक्रियेअंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
त्यावर अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

Web Title: Government's decision to start religious places soon