'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

By मनोहर कुंभेजकर | Published: March 21, 2023 06:11 PM2023-03-21T18:11:42+5:302023-03-21T18:12:24+5:30

एच३एन२ एका नवीन आव्हानाचा सामना राज्यातील सर्व स्तरातील आरोग्य खात्याला करावा लागणार आहे.

Government should pay serious attention to H3N2 former Health Minister Dr. Deepak Sawant's request to Chief Minister | 'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

googlenewsNext

मुंबई - एच३एन२ या नव्या व्हायरसला आज नागरिक सहजपणे घेत आहे. नागरिकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा फ्ल्यू डोकेवर काढत आहे. देशातदेखील अनेक भागांत हे रूग्ण आढळत असून मुंबई महाराष्ट्र येथेही अनेक खाजगी दवाखान्यातील पेशन्टची गर्दी हेच सागंत आहे. एच३एन२ हा एच१एन१ च्या जातकुळीतला विषाणू आहे. त्यामुळे एच३एन२ कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देवून पेशन्ट कसा ट्रीट करावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात. जरी पेशन्टला व्हेंटिलेटर लागत नसले तरी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे जनरल प्रॅक्टीशीनर्ससाठी मार्गदर्शक सूचना त्वरित द्याव्यात, अशी विनंती माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

एच३एन२ एका नवीन आव्हानाचा सामना राज्यातील सर्व स्तरातील आरोग्य खात्याला करावा लागणार आहे. या पूर्वी एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्ल्यूचा सामना २०१० मधे करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा २०१७ मधे मोठ्या प्रमाणावर स्वाईन मुळे मृत्यू झाले. २०१० मधे संसर्ग हा मोठ्या प्रमाणात उघड्यावर मास्क फेकले गेले त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दत फारशी माहीत नव्हती. यावेळी सुरूवात पुणे विभागात मोठ्या प्रमाणात संसर्ग पाहावयास मिळाला, येथील हवामानही विषाणूच्या वाढीसाठी पोषक होते. या सर्वाचा विचार होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एच३एन२ संसर्गासाठी होणाऱ्या चाचण्या प्रमाण खूप कमी आहे. या चाचण्या सर्व शासकीय निमशासकीय हॅास्पीटल्स हेल्थ पोस्ट, तालुका स्तरावर उपलब्ध व्हाव्यात. या साथीत कोवीड व स्वाईन फ्ल्यू या संसर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या सर्व व्हायरसची चाचणी ज्यामधे सार्स कोवीड एच१एन१, एच३एन२, आरएसव्ही, इन्फल्युन्झा अ-इन्फल्युन्झा-बी या सर्व महागड्या टेस्ट आहेत. या सर्वांची लक्षणे सारखी असल्याने वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान असल्याचे डॉ.दीपक सावंत म्हणाले.

एच३एन२साठी नेमके काय करायचे या विषयी मार्गदर्शक तत्वे जारी करून अगदी ग्राम पातळींवर लोकजागरण होणे आवश्यक आहे. मास्क वापरणे लक्षणाची सुरवात झाल्यास वेळेत डॅाक्टराचा सल्ला घेणे सेल्फ मेडीकेशन न करणे अशा सारखी तत्वे पाळणे गरजेचे आहे. एच३एन२ जरी घातक नसला तरी त्याचे म्युटेशन होते का पाहाणे गरजेचे आहे,  त्यासाठी  जीनोम सिक्वेसिग आवश्यक आहे. तसेच अँण्टी व्हायरल औषधाचा परिणाम  कसा  होतो हे पाहाणे गरजेचे असल्याचे मत डॅा. दीपक सावंत यांनी शेवटी व्यक्त केले

Web Title: Government should pay serious attention to H3N2 former Health Minister Dr. Deepak Sawant's request to Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.