नियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 07:33 IST2020-10-01T07:33:23+5:302020-10-01T07:33:33+5:30
रेल्वे अधिकारी : ...तर एका दिवसात सेवा सुरू करू

नियमित लोकलसाठी सरकारने रेल्वेकडे संपर्क केलेला नाही
मुंबई : सध्या आपत्कालीन सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मुंबईचीलोकल रेल्वे सेवा सुरू आहे. १५ आॅक्टोबरदरम्यान सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून याबाबत रेल्वेला कोणतीही विनंती करण्यात आली नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, सर्वसामान्यांसाठी नियमित लोकल सेवेचे नियोजन करण्यासाठी दोन ते चार दिवस आवश्यक आहेत. तशी आगाऊ कल्पना राज्य सरकारने द्यायला हवी. अद्याप त्यांच्याकडून तशी विनंती करण्यात आलेली नाही. परंतु, लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी ठेवली आहे. विनंती आल्यानंतर प्रसंगी एका दिवसात रेल्वे सुरू करू, असा दावा अधिकाºयाने केला आहे.
आजपासून दोन महिला विशेष लोकल
मध्य रेल्वेमार्गावर दोन महिला विशेष लोकलसह मुख्य मार्गावर चार आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर चार अशा आठ विशेष लोकलफेºया गुरुवारपासून चालवण्यात येणार आहेत. -