सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही - चरणसिंग सप्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:36 AM2019-10-11T01:36:58+5:302019-10-11T01:37:18+5:30

आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सप्रा बोलत होते.

Government cannot be held accountable - Charan Singh Supra | सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही - चरणसिंग सप्रा

सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही - चरणसिंग सप्रा

googlenewsNext

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्टÑ को-आॅपरेटिव्ह बँकेचा (पीएमसी) कारभार रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतो. केंद्र सरकारचे त्यावर नियंत्रण नसते, असे सांगून सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. भाजप सरकारने दोन तासांत आरेची झाडे तोडली. परंतु, आज १७ दिवस झाले तरी १६ लाख खातेदारांचा विचारसुद्धा सरकार करीत नसल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी गुरुवारी केला.
आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सप्रा बोलत होते. या वेळी महासचिव संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे उपस्थित होते. सप्रा म्हणाले की, पीएमसी बँक प्रकरणी आरबीआयच्या गव्हर्नरची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.
पीएमसी बँक ही सहकारी बँक आहे आणि ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यावर आरबीआयचे त्यावर नियंत्रण असल्याचे कारण अर्थमंत्र्यांनी दिले. मात्र, त्यांनी बँकेच्या १६ लाख खातेदारांबद्दल अवाक्षर काढले नाही. खातेधारकांचे पैसे कधी मिळणार यावर कोणतेही भाष्य केले नाही. आरबीआयकडे बोट दाखवून केंद्र सरकार स्वत:ची जबाबदारी झटकू शकत नाही, असे सप्रा म्हणाले.

‘स्वत:च्याच पैशांसाठी पीएमसीच्या खातेदारांची फरपट सुरू’
आरबीआय ही स्वायत्त संस्था असली तरी केंद्र सरकारलाही पुरेसे अधिकार आहेत. पीएमसी बँकेसारख्या अनेक बँकांना वाचविण्यासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले आहेत. पीएमसी ही सहकारी बँक असली तरी मोठी बँक आहे.
या बँकेचे १६ लाख खातेधारक आहेत. दीड हजार क्रेडिट सोसायट्यांची येथे खाती आहेत. आज १७ दिवस झाले या खातेधारकांची स्वत:च्या पैशांसाठीच फरपट सुरू आहे. त्यांचा विचारसुद्धा हे सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

Web Title: Government cannot be held accountable - Charan Singh Supra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.