पत्राचाळ-म्हाडामध्ये ‘तू तू...मैं मैं', दुकानांना विरोध तर लॉटरीवरही रहिवासी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 10:03 AM2024-01-03T10:03:58+5:302024-01-03T10:04:35+5:30

गोरेगाव येथील पत्राचाळीचा प्रकल्प रहिवासी आणि म्हाडामधील ‘तू तू...मैं मैं’ नंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Goregaon patrachal mhada opposition to shops and residents are also upset over lottery by mhada in mumbai | पत्राचाळ-म्हाडामध्ये ‘तू तू...मैं मैं', दुकानांना विरोध तर लॉटरीवरही रहिवासी नाराज

पत्राचाळ-म्हाडामध्ये ‘तू तू...मैं मैं', दुकानांना विरोध तर लॉटरीवरही रहिवासी नाराज

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळीतील रहिवाशांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांसह दुकानांची लॉटरी काढण्यावर म्हाडा आग्रही असली तरी रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आहे कारण लॉटरी ओसीनंतर काढली जाते, रहिवाशांचे म्हणणे आहे. आता म्हाडा येथे ७६ व्यावसायिक गाळे बांधण्यावर ठाम असतानाच रहिवाशांनी याला विरोध दर्शविला असून, मंगळवारी रहिवाशांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीनंतरही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे गोरेगाव येथील पत्राचाळीचा प्रकल्प रहिवासी आणि म्हाडामधील ‘तू तू...मैं मैं’ नंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

म्हाडा आणि रहिवाशांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर नियमांनुसार काम केले जाईल. रहिवासी, संस्था एकमेकांमध्ये चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया कळवतील.

या प्रक्रियेला आणखी एक महिना लागेल, अशी माहिती ‘म्हाडा’कडून देण्यात आली तर बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पत्राचाळमधील त्रिपक्षीय करार  म्हाडा, रहिवासी आणि बिल्डरमध्ये झाले. त्यानुसार, घरांची लॉटरी काढण्यासह घरांचा ताबा देण्याची जबाबदारी संस्थेची आहे. 

म्हाडा रहिवाशांच्या हक्कांना बाधा आणत आहे. रहिवाशांचा दुकानांना विरोध आहे. 
येथे केवळ घरेच असावीत, असे रहिवाशांचे ठाम म्हणणे आहेय
शिवाय घरे बांधून होण्यापूर्वीच घरांच्या लॉटरीचा विचार कसा आणि का केला जातो ? असाही सवाल केला जात आहे.

 पत्राचाळीतील रहिवाशांसाठी ६८६ घरे बांधली जात आहे.

 आर ९ प्लॉट रहिवाशांसाठी आहे.

 आर ९ प्लॉटचा ताबा रहिवाशांना देण्यात यावा, असे रहिवाशांचे म्हणणे आहे

 करारानुसार सदस्य बनविणे आणि लॉटरी काढणे हे संस्थेचे काम आहे.

 संस्थेचे हक्क हिरावले जात आहेत, असे संस्थेचे म्हणणे आहे.

 करार करण्याबाबत म्हाडा गेले दीड वर्षे काहीही प्रतिसाद देत नाही.

 ६८६ घरांव्यतीरिक्त ७६ दुकाने बांधली जात आहेत.

 लॉटरी काढण्यासाठी म्हाडा एवढी आग्रही व घाईत का आहे?.

 आर-९ वगळून बाकी प्लॉट बिल्डरचे होते.

 आर-९ फक्त रहिवाशांसाठी आहे.

म्हाडा मात्र लॉटरी काढण्यावर ठाम :

त्रिपक्षीय कराराप्रमाणे घरांचा ताबा देणे आणि घरांची लॉटरी काढणे ही जबाबदारी गोरेगाव सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची आहे. म्हाडा मात्र घरे आणि दुकानांची लॉटरी काढण्यावर ठाम आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बांधकामाची सुरुवात झाल्यापासून संस्थेला कोणत्याच प्रक्रियेमध्ये विश्वासात घेण्यात आले नाही.

Web Title: Goregaon patrachal mhada opposition to shops and residents are also upset over lottery by mhada in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.