मुंबईकर खोळंबले! तिकडे वाशी पुलावर अपघात, इकडे मध्य रेल्वेवर मालगाडी बंद पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 09:29 IST2023-06-26T09:29:11+5:302023-06-26T09:29:24+5:30

सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते.

goods train engine was stopped on the Central Railway Ambernath badlapur Station, Local train Stopped on up line | मुंबईकर खोळंबले! तिकडे वाशी पुलावर अपघात, इकडे मध्य रेल्वेवर मालगाडी बंद पडली

मुंबईकर खोळंबले! तिकडे वाशी पुलावर अपघात, इकडे मध्य रेल्वेवर मालगाडी बंद पडली

मुंबईत रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच सोमवारचा दिवस असल्याने नोकरदार वर्गाची कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लगबग सुरु होती. परंतू, सकाळी सकाळी वाशी खाडी पुलावर ट्रेलरचा अपघात आणि इकडे मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने खोळंबा झाला आहे. 

सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मध्य रेल्वेवर कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले आहे. यामुळे गेल्या पाऊण तासापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

कल्याणहून इंजिन मागविण्यात आले आहे. मालगाडी बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. परंतू यास वेळ लागणार आहे. तसेच काही लोकल रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे. या बिघाडाचा परिणाम आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: goods train engine was stopped on the Central Railway Ambernath badlapur Station, Local train Stopped on up line

टॅग्स :localलोकल