Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालगाडीचे चाक रुळावरुन घसरल्याने हार्बर रेल्वे ठप्प; घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 00:52 IST

पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेसेवा ठप्प राहणार आहे. 

मुंबई - हार्बर रेल्वेवरील कुर्ला स्थानकादरम्यान मालगाडीचे चाक रुळावरुन घसरल्याने हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे उशिरा घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेत.

कुर्ला ते पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेसेवा ठप्प राहणार आहे. 

याबाबत रेल्वे प्रवाशी परिषदेचे पदाधिकारी सुभाष गुप्ता यांनी ट्विटरवरुन रेल्वे मंत्री यांना माहिती दिली आहे. तसेच हार्बर लाईन विस्कळीत झाल्याने प्रवाशांना घरी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच रिक्षाचालकांकडूनही प्रवाशांची लूट होत असल्याचं दिसून येत आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :रेल्वेहार्बर रेल्वे