अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 09:37 IST2023-07-14T09:36:52+5:302023-07-14T09:37:21+5:30
ज्यांनी सदनिकांची नाेंदणी केली हाेती, त्यांचे पैसे परत करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

अबब! मुंबईतील दोन एकर जमिनीला सोन्याचा भाव; किंमत तब्बल ७०४ काेटी रुपये
मुंबई - शहरातील दाेन एकरपेक्षा जास्त जमिनीचा तब्बल ७०४ काेटी रुपयांमध्ये साैदा झाला आहे. प्रेस्टीज समूहाने डीबी रिअल्टीकडून या जमिनीची खरेदी केली आहे. रिअल इस्टेट व्यवहारांची माहिती देणारी संस्था ‘सीआरई मेट्रिक्स’ने यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २.३ एकरचे दाेन भूखंड वांद्रे कुर्ला संकुल आणि महलक्ष्मी या भागात आहेत. डीबी रिअल्टीने त्यावर निवासी संकुलाचे काम सुरू केले हाेते. मात्र, त्यास परवानगी मिळाली नव्हती. कर्ज वाढल्यामुळे कंपनीने भूखंड विकले आहेत. ज्यांनी सदनिकांची नाेंदणी केली हाेती, त्यांचे पैसे परत करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.