Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सोन्याचा दर थेट ८ हजार रुपयांनी घसरला; दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांची अधिक पसंती; उलाढाल २०० कोटींच्या घरात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:01 IST

मुंबई :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचा बाजार प्रतितोळा १ लाख ४९ हजारांवर बंद झाला. ...

मुंबई :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचा बाजार प्रतितोळा १ लाख ४९ हजारांवर बंद झाला. बुधवारच्या तुलनेत हा  दर आठ हजारांनी घसरला. मार्केट बंद होतानाच भाव खाली आल्याने ग्राहकांना याची फारशी माहिती मिळाली नाही. दरम्यान, नाण्यांपेक्षा यंदा दागिन्यांना ग्राहकांची पसंती होती.सोने खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दक्षिण मुंबईमधील झवेरी बाजारातील सराफ कुमार जैन यांनी सांगितले. नाणी खरेदी करतानाच ग्राहकांना अंगठी, सोनसाखळी, मंगळसूत्राची खरेदी केल्याचे सांगितले. शिवाय मुंबईत दिवसभर या मौल्यवान धातूची उलाढाल २०० कोटींच्या आसपास झाल्याचेही कुमार जैन यांनी सांगितले. पूर्व उपनगरातील ज्वेलर्स निर्भय सिंग यांनी सांगितले, बुधवारी सोन्याचा दर १ लाख ५७ हजार होता. दुपारपर्यंत दरांत चढ-उतार नोंदविले जात असतानाच मार्केट बंद होताना दर १ लाख ४९ हजार नोंदविण्यात आला. 

युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर -सोनसाखळी, अंगठी आणि मंगळसूत्रासारख्या दागिन्यांना ग्राहकांनी पसंती दिली. नाण्यांची खरेदी १० टक्के असल्याचा कयास बांधताना शुक्रवारी सोन्याचे मार्केट कोणत्या आकड्याने खुले होईल, हे सांगणे कठीण असल्याचे ज्वेलर्स निर्भय सिंग म्हणाले. दरम्यान, आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धांचा मोठा परिणाम सोन्याच्या भावावर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices plummet on Gudi Padwa, jewelry sales surge.

Web Summary : Gold prices fell by ₹8,000 on Gudi Padwa, closing at ₹1,49,000 per tola. Jewelry purchases surpassed coin sales. Mumbai saw a ₹200 crore turnover. War in gulf countries impacted prices.
टॅग्स :सोनंगुढीपाडवाचांदीबाजार