Join us
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन किलोचे सोन्याचे दागिने झवेरी बाजार परिसरातून लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:30 IST

व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दिलेले एक कोटी १० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार झाल्याचा प्रकार झवेरी बाजार परिसरात घडला.

मुंबई  -  व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दिलेले एक कोटी १० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार झाल्याचा प्रकार झवेरी बाजार परिसरात घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घाटकोपर येथील भटवाडीतील महेंद्रकुमार जैन यांचा पुतण्या तरुण जैन याने झवेरी बाजारातील महेंद्र ज्वेलर्स येथील दोघांना २४ एप्रिलला सायंकाळी ३,३५० ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटचे सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, त्यांनी त्याची परस्पर विक्री करून जैन यांची फसवणूक केली. ते दागिने परत देण्यास टाळाटाळ करू लागल्यानंतर जैन यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी