मुंबई : मुंबईसह देशात पहिल्यांदाच दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी अधिक झाल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालातून समोर आली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतात ८२ टन सोने गुंतवणुकीसाठी (गोल्ड ईटीएफ, नाणी आणि बार) खरेदी करण्यात आले, तर दागिन्यांसाठी ही मागणी ६६ टनवर मर्यादित राहिली. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत या ट्रेंडचा विशेष प्रभाव दिसून येत आहे.
सोन्याला 'सुरक्षितता कवच' म्हणून पसंती मुंबईतील गुंतवणूक सल्लागारांच्या मते, सोन्याला 'सुरक्षितता कवच' म्हणूनच पाहणे योग्य ठरेल. गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा सुमारे १० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवावा आणि बाजारातील चढ-उतारानुसार त्यात अति वाढ टाळावी, असा सल्ला दिला जात आहे.
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे
गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर वळण घेतले आहे. जानेवारी २०२६ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये तब्बल २४,०४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी आतापर्यंतची सर्वोच्च मासिक आवक ठरली. या काळात जागतिक ईटीएफ सोन्याच्या मागणीत भारताचा वाटा ३२ टक्के होता.
वाढत्या सोन्याच्या २ किमतीमुळे दागिन्यांची मागणी मात्र १९ टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, एकूण सोन्याच्या वापरामध्ये दागिन्यांचा वाटा सुमारे ३० टक्क्यांवर आला असून, हा २००२ नंतरचा सर्वात कमी स्तर आहे. उलट गुंतवणुकीचा वाटा जवळपास ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
Web Summary : Mumbai sees gold investment exceeding jewelry purchases. Investors seek safe haven due to stock market instability. Gold ETFs see record inflows, while jewelry demand declines, shifting gold consumption patterns.
Web Summary : मुंबई में सोने में निवेश गहनों की खरीद से ज़्यादा। शेयर बाज़ार की अस्थिरता से निवेशक सुरक्षित विकल्प खोज रहे हैं। गोल्ड ईटीएफ में रिकॉर्ड आवक, गहनों की मांग में गिरावट।