मुंबई : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ झाली असून प्रति तोळा १ लाख ५६ हजार रुपयांवर बुधवारी ते पोहोचले. सणाच्या दिवशी गुरुवारी सोने आणि चांदीचे सुमारे २०० कोटी रुपयांचे व्यवहार होतील, असा अंदाजही सराफ बाजाराने व्यक्त केला. विशेष म्हणजे यंदा या दोन्ही मौल्यवान धातूंच्या नाण्यांच्या खरेदीकडे अनेकांचा कल आहे.
“दर वाढले असले, तरी ग्राहकांचा या मौल्यवान धातूच्या खरेदीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. गुढीपाडवा या महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने अनेकजण गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोने आणि चांदी खरेदी आवर्जून करत आहेत,” असे दक्षिण मुंबईतील सराफ व्यावसायिक कुमार जैन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बाजारात चैतन्याचे वातावरण...गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचा दर किंचित घसरून १ लाख ५५ हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चांदीचा दर प्रति किलो २ लाख ५६ हजार रुपयांवर स्थिर असून, या मौल्यवान धातूच्या खरेदीतही नाण्यांना विशेष मागणी आहे. एकंदरीत, वाढत्या दरांकडे न पाहता गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात चैतन्याचे वातावरण आहे, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.
गुढीपाडवा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे भाव वाढले झाले, तरी सोन्याची खरेदी केली जाईल. गेल्या वर्षी अडीचशे ते तीनशे टन सोन्याची विक्री झाली होती, असा अंदाज आहे. या तुलनेत यंदा तब्बल आठ ते दहा टक्के वाढ अपेक्षित आहे.आनंद पेडणेकर, ज्वेलर्स
...म्हणून दरवाढडॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण आणि विविध देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दराने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मात्र, गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने ग्राहक उच्च दरांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. सराफांच्या माहितीनुसार, यंदा ग्राहकांचा सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीकडे अधिक आहे.
Web Summary : Gold prices hit a record ₹1.56 lakh per tola ahead of Gudi Padwa. The Sarafa market anticipates ₹200 crore in gold and silver transactions. Despite high prices, coin purchases are popular, driven by the auspiciousness of buying gold during the festival and investment opportunities.
Web Summary : गुड़ी पड़वा से पहले सोने की कीमतें ₹1.56 लाख प्रति तोला के रिकॉर्ड स्तर पर पहुंच गईं। सराफा बाजार को ₹200 करोड़ के सोने और चांदी के लेनदेन की उम्मीद है। ऊंची कीमतों के बावजूद, त्योहार के दौरान सोना खरीदने की शुभता और निवेश के अवसरों के कारण सिक्के की खरीदारी लोकप्रिय है।