पर्यटकांच्या यादीत गोवाच नंबर वन; जयपूर कोची, वाराणसी अन् विशाखापट्टणमही आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 06:49 IST2023-01-09T06:48:55+5:302023-01-09T06:49:02+5:30
जानेवारी - सप्टेंबर २०२२ दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठी पर्यटनामध्ये ६२ टक्के वाढ झाली.

पर्यटकांच्या यादीत गोवाच नंबर वन; जयपूर कोची, वाराणसी अन् विशाखापट्टणमही आघाडीवर
मुंबई : जयपूर व गोवा विश्रांतीसाठी लोकप्रिय म्हणून कायम तर कोची, वाराणसी व विशाखापट्टणम भारतातील सर्वात बुक करण्यात येणारी पर्यटन स्थळे म्हणून आघाडीवर आहेत. दुसरीकडे दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता व चेन्नई ही स्थळे व्यवसायिकदृष्ट्या अव्वल स्थानी आहेत. जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या बुकिंग डेटाच्या संशोधनानुसार हा कल मांडण्यात आला आहे.
जानेवारी - सप्टेंबर २०२२ दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठी पर्यटनामध्ये ६२ टक्के वाढ झाली. जून २०२२ मध्ये मागच्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मागणीत सर्वाधिक वाढ झाली. जयपूर व गोवा ही भारतातील लोकप्रिय विश्रांतीची स्थळे म्हणून सातत्याने आघाडीवर आहेत. कोची, वाराणसी व विशाखापट्टणमदेखील पर्यटकांमध्ये अव्वल क्रमांकाची स्थळे म्हणून उदयास आली आहेत. वारसा असलेल्या शहरांनंतर समुद्र किनारा असलेल्या स्थानांकडे कल स्पष्टपणे दिसून येतो.
काय आहे अंदाज?
२० टक्के हेरिटेज शहरे आणि जवळपास १० टक्के समुद्रकिनारा गंतव्ये पसंतीची असण्याचा अंदाज आहे. प्रयागराज, रायपूर, पुरी, नाशिक, बरेली यांसारखी अनेक इतर स्थळे या यादीत समाविष्ट आहेत.
जागतिक स्तरावर
युरोप, नेदरलँड्स, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रिया आणि फ्रान्स ही काही सर्वाधिक लोकप्रिय स्थळे आहेत.
सर्वाधिक मागणी...
मेट्रोपॉलिटन शहरांपैकी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईला सर्वाधिक प्रवासाची मागणी असेल.