Join us
Daily Top 2Weekly Top 5

संधी मिळाली, मी फक्त केले सोने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:37 IST

आकांक्षा सोनावणे : ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार झाल्याचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडियाच्या महिला विमानचालकांनी विक्रम रचला आहे. त्यांनी बोईंग-७७७ एसएफओ-बीएलआर या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करून जगातील सर्वांत जास्त लांबीचा म्हणजे १६ हजार किमीचा सॅन फ्रॅन्सिस्को ते बंगळुरू हवाई प्रवास केला. हे विमान सोमवारी पहाटे बंगळुरू येथे दाखल झाले.  या पथकात असलेल्या मुंबईकर एअर इंडियाच्या महिला वैमानिक कॅ. आकांक्षा सोनावणे म्हणाल्या की, मला मिळालेल्या संधीचे मी साेने केले, हा माझा नव्हे तर एअर इंडियाचा विजय आहे.

आकांक्षा सोमवारी सकाळी आपल्या वांद्रे येथील घरी दाखल झाल्या. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत असतानाच आकांक्षा यांच्या आई प्रभा यांनीही त्यांच्या मुलीचे अनुभव सांगत प्रतिक्रिया दिली. वैमानिक महिला असो किंवा पुरुष; काम हे काम असते. मी असे काही स्वप्न पाहिले नव्हते. मात्र माझ्या कामावर माझ्या कंपनीने विश्वास ठेवला हे मी माझे भाग्य समजते. त्यांनी मला जी संधी दिली, तिचे मला सोने करता आले यातच सारे काही आले. या  ऐतिहासिक क्षणांचा मी एक भाग आहे याचा आनंद आहे. अभिमान आहे. गर्व आहे, अशी प्रतिक्रिया कॅ. आकांक्षा सोनावणे यांनी दिल्याचे आकांक्षा यांच्या आई प्रभा सोनावणे यांनी सांगितले. आजच्या प्रवासाची त्यांच्या कामात एक वेगळी नोंद झाल्याने मी उत्साही आहे, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर ध्रुवावरून विमान उडविणे आव्हानात्मकउत्तर ध्रुवावरून विमान उडविणे आव्हानात्मक असते. एअर इंडियाने ही जबाबदारी विमानचालक कॅ. झोया अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कॅ. आकांक्षा सोनावणे, कॅ. थनमाई पापागारी, कॅ. शिवानी मनहास व  कॅ. निवेदिता भसिन या महिलांकडे  दिली होती. ९ जानेवारीला सॅन फ्रान्सिस्कोवरून उड्डाण केलेले हे विमान उत्तर ध्रुवावरून झेपावत बंगळुरूत ११ जानेवारी रोजी उतरले.

टॅग्स :हवाईदलविमानमुंबई