Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानद डी. लिट द्या! मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्रस्ताव सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:02 IST

यावेळी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा अभ्यास करून पुढील अधिसभेत हा प्रस्ताव सादर केला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले.

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मानद डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी बहाल करावी, असा प्रस्ताव विद्यापीठाच्या शनिवारी पार पडलेल्या अधिसभा बैठकीत सादर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींचा अभ्यास करून पुढील अधिसभेत हा प्रस्ताव सादर केला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले.

भाजप नेत्या आणि सिनेट सदस्य शीतल शेठ देवरूखकर यांनी हा प्रस्ताव सादर केला. सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, इतिहास आणि साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान यांचा उल्लेख करून त्यांना डी. लिट ही पदवी बहाल करावी, अशी मागणी शेठ देवरूखकर यांनी केली. त्याला ठाकरे गटाच्या युवासेनेने पाठिंबा दिला. मात्र सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान वादातीत असल्याची भूमिका घेत प्राध्यापकांच्या बुक्टू या संघटनेने प्रस्तावावर तटस्थ भूमिका घेतली.  सावरकरांनी मराठी साहित्यातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विज्ञाननिष्ठ राष्ट्रवाद जोपासला. सामाजिक समतेची मांडणी करून त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला होता, असे शेठ देवरूखकर यांनी प्रस्ताव सादर करताना बैठकीत सांगितले. 

यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांसारख्या महान व्यक्तींना मरणोत्तर डी.लिट पदवी बहाल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Savarkar D. Litt Proposal: Mumbai University Senate Considers Honorary Degree

Web Summary : Mumbai University's senate discussed awarding Savarkar a D. Litt. degree, citing his contributions to freedom, history, and literature. A BJP member proposed it, supported by Shiv Sena (Thackeray group), while a professors' organization remained neutral. The administration will review the proposal.
टॅग्स :विनायक दामोदर सावरकरमुंबई विद्यापीठ