Join us

"अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करून मच्छिमारांना आर्थिक दिलासा द्या"

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 11, 2025 15:33 IST

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मच्छिमारांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन बिन-व्याजी कर्जाची व्यवस्था केली होती. 

-मनोहर कुंभेजकर, मुंबईराज्यात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या नुकसानीचा पंचनामा करून मच्छिमारांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कडे केली आहे.अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी ही माहिती दिली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सन १९८९ साली महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीला वादळाचा तारख्याला समोरे जावे लागले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी मच्छिमारांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन बिन-व्याजी कर्जाची व्यवस्था केली होती. 

मागील थकीत कर्जाची रक्कम नव्या कर्जात सामील करून ५ वर्षासाठी बिन-व्याजी कर्जाची व्यवस्था उभी केल्याने मच्छिमार समाजाला आपला व्यवसाय नव्याने उभा करायला आणि स्वाभिमानाने जगायला प्रेरणा मिळाली होती अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबई सह पालघर,ठाणे जिल्ह्यातील मच्छिमारांचे अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे मासेमारी नौकेचे आणि सुक्या मासळीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मच्छिमारांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करण्याची विनंती अखिल महाराष्ट्र मच्छिमार समितीने केली आहे.यामध्ये नौका मालकांचे सध्याचे कर्ज नवीन बिन-व्याजी कर्जात रूपांतर करून दोन वर्षासाठी कर्जाची अधिस्थग केल्याने कर्ज फेड पुढे ढकलण्याची व्यवस्था निर्माण करणे तसेच सुक्या मासळीचे झालेले नुकसान पाहता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. 

पालघर, ठाणे आणि मुंबईतील मच्छिमार कोळी महिलांना ३० कोटींची आर्थिक सहकार्य करण्याची मागणी आपण शासनाकडे केल्याची माहिती तांडेल यांनी दिली.

टॅग्स :मच्छीमारमुंबईदुष्काळमहाराष्ट्र सरकार