Join us  

परीक्षार्थींना रेल्वे प्रवासाची सवलत द्या, मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 8:53 PM

कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली

मुंबई : वैद्यकिय पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या दि, ८ सप्टेंबर पासून सुरू होत आहेत. या परीक्षांना स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परीक्षा केंद्रावर जाणे विद्यार्थ्यांना सोयीस्कर होण्यासाठी मेडिकल पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे रेल्वेतून प्रवास करण्याची सवलत द्यावी अशी नम्र विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस यांनी केली आहे.याप्रसंगी परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अँड. अनिल परब उपस्थित होते.

कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देणे धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. परंतू याचिका दाखल करण्यास उशीर झाल्याचे सांगत न्यायालयाने हि मागणी फेटाळून लावली. यास्तव सर्व परीक्षार्थींना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाणे भाग असून विविध भागातून प्रवास केंद्रावर पोहचणे अडचणीचे ठरणार आहे. रस्त्यावरुन जाण्याऱ्या परिक्षार्थींना वाहतूकीची समस्या भेडसावणार असून वेळेवर पोहचणे देखिल कठिण होणार आहे.त्यामुळे मेडिकल पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे रेल्वेतून प्रवास करण्याची सवलत द्यावी अशी आग्रही मागणी केल्याचे आमदार विलास पोतनीस यांनी सांगितले.

टॅग्स :शिवसेनारेल्वेलोकलमुंबईउद्धव ठाकरे