लग्नाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

By Admin | Updated: July 17, 2014 01:54 IST2014-07-17T01:54:40+5:302014-07-17T01:54:40+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे

The girl's betrayal by the wedding bait | लग्नाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

लग्नाच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवून तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे. स्वत: विवाहित असतानाही पती-पत्नीने सदर तरुणीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानपाडा येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. कोपरखैरणे सेक्टर १४ येथे राहणाऱ्या सागर अशोक चौधरी (३३) याचे तिच्याबरोबर गेली चार वर्षे प्रेमसंबंध होते. सागर याचे लग्न झालेले असतानाही त्याने या तरुणीसोबत प्रेमप्रकरणातून शरीरसंबंध ठेवले होते. काही महिन्यांपासून सदर तरुणीने सागर याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे सागर याने तिच्याशी संपर्क तोडला होता. अखेर ही तरुणी अचानक त्याच्या घरी गेली असता तेथे एक महिला व लहान मुलगा आढळून आला. त्यामुळे सदर तरुणीने सागर याच्याकडे याबाबतची चौकशी केली असता त्याने लहान मुलगा आपण दत्तक घेतलेला असून त्याच्या संगोपनासाठी ठेवलेली महिला नोकराणी असल्याचे सांगितले. मात्र तरुणीला या प्रकरणाचा संशय आल्याने पुन्हा तिने घरी जाऊन त्या महिलेशी संपर्क साधला. यावेळी सदर महिला ही सागर याची पत्नी व त्याचाच मुलगा असल्याचे तिला समजले. परंतु यावेळी सागर व त्याची पत्नी प्रीती या दोघांनी सदर तरुणीला धमकावले. झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तोंडावर अ‍ॅसिड फेकेन, गुंडांकडून उचलून नेईन अशा प्रकारच्या धमक्या तिला दिल्या. तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर याला अटक केली असून त्याला १९ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The girl's betrayal by the wedding bait