मुंबई : चारकोप पोलिसांच्या हद्दीत असलेल्या म्हाडा अष्टविनायक सोसायटी बिल्डिंग येथे कचराकुंडीमध्ये अंदाजे सात महिन्यांची बालिका मृतावस्थेत सोमवारी आढळली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला.
म्हाडाच्या इमारतीमधूनच या बालिकेला फेकण्यात आल्याचीही चर्चा होती, मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती आढळलेली नसून त्या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे अधिकारी म्हणाले. बालिकेचा मृत्यू लपवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा हा प्रकार असून, त्यानुसार पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.