Join us  

दोषींवर कडक कारवाई करणार!- गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:04 AM

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले.

मुंबई : नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत तिच्या कुटुंबीयांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले. या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या कुटुंबीयांची भेट घेत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पायलच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी मंगळवारी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.यासंदर्भात बोलताना मंत्री महाजन म्हणाले, डॉ. पायल यांना त्रास देणाऱ्या तिन्ही डॉक्टरना अधिष्ठात्यांनी निलंबित केले आहे. त्याशिवाय पायल शिकत असणाºया विभागातील युनिट हेडचेही निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी डॉ. पायल यांचे कुटुंबीय आणि रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांसोबत बैठक घेणार आहे. यासंदर्भात चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :गिरीश महाजनपायल तडवी