Join us

सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास नाहीच; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 23:05 IST

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर सर्वसामान्यांसाठी एकही लोकल धावणार नाही.  रेल्वे बोर्डाने 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशा ४२ दिवसांची तिकिटे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ठळक मुद्देदेशभरातील रेल्वे सेवा संपूर्णरित्या बंद आहे. ही सेवा जुलै महिन्यात सुरु होण्याची आशा होती. मात्र १२ ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, उपनगरीय लोकल बंद राहणार आहे.

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस १२ ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.

देशभरातील रेल्वे सेवा संपूर्णरित्या बंद आहे. ही सेवा जुलै महिन्यात सुरु होण्याची आशा होती. मात्र १२ ऑगस्टपर्यंत लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, उपनगरीय लोकल बंद राहणार आहे. मात्र उपनगरीय मार्गावर धावणारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार आहे.

देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर सर्वसामान्यांसाठी एकही लोकल धावणार नाही.  रेल्वे बोर्डाने 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशा ४२ दिवसांची तिकिटे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

- १ जूलै ते १२ ऑगस्ट या काळातील वेळापत्रकाप्रमाणे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटांचा संपूर्ण परतावा देण्यात येईल. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या विशेष प्रवासी मेल-एक्सप्रेस यापुढे ही सुरुच राहणार आहे,  रेल्वे मंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

- एक मे पासून विविध राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीकरिता श्रमिक ट्रेन,१२ मे पासून  देशातील निवडक १५ मार्गावर राजधानी स्पेशल ट्रेन तर आणि १ जूनपासुन २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. परंतु सामान्य नागरिकांसाठी मात्र लोकल सेवा बंदच राहणार आहे. १२ ऑगस्टपर्यतच्या लांब पल्याच्या गाड्यांचे आरक्षण देखील रद्द करण्यात येणार असून त्या प्रवाशांना तिकिटाचा रिफंड दिला जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या सुरूच राहणार आहेत. याव्यतिरिक उपनगरीय लोकल फेऱ्यांबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. - प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

आणखी बातम्या...

इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा 'शहीद' असा उल्लेख

कोरोनाचा 'या' विमान कंपनीला फटका; सहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले 12 महत्त्वाचे निर्णय; वस्तू व सेवाकर अधिनियमात मोठी सुधारणा

शेतकऱ्याची कमाल! पिकवले अनोखे 'कलिंगड', बाहेरून 'हिरवे' अन् आतून 'पिवळे'

आयुक्तांच्या बदल्यांमागे एकनाथ शिंदेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

 

टॅग्स :मुंबई लोकलरेल्वे