General passengers traveling from Diyarbank can be fined Rs | दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांकडून ३४ लाखांची दंडवसुली
दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांकडून ३४ लाखांची दंडवसुली

मुंबई : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत दिव्यांग डब्यांतून प्रवास करणाºया १३ हजार ५४२ प्रवाशांवर कारवाई करून ३४ लाखांचा दंड रेल्वे प्रशासनाने वसूल केला. यासह तीन जणांना तुरुंगात कैद करण्यात आले आहे.
दररोजच्या गर्दीतून मुक्तता मिळण्यासाठी किंवा काही वेळा अनवधानाने सामान्य प्रवासी दिव्यांग डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग डब्यात बसण्यासाठी जागा मिळत नाही. मध्य आणि हार्बर मार्गावरील धावणाºया लोकलच्या दिव्यांगाच्या डब्यातून सामान्य प्रवासी प्रवास करण्याच्या वारंवार तक्रार दाखल होत होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत कारवाई करून दंडाची वसुली केली.
जानेवारी ते सप्टेंबर, २०१९ या कालावधीत केलेल्या कारवाईत ठाणे स्थानक अव्वल आहे. त्यानंतर, दादर आणि तुर्भे या स्थानकांचा क्रमांक लागतो. ठाणे स्थानकात ३ हजार ८२३ प्रवाशांवर कारवाई करून ११ लाख १६ हजार ९०० रुपयांची दंडाची वसुली करण्यात आली आहे.
दादर स्थानकात १ हजार ५३५ प्रवाशांवर कारवाई करून ३ लाख १ हजार ४३२ रुपयांची दंडाची वसुली केली. तुर्भे स्थानकात १ हजार ४८४ प्रवाशांवर कारवाई करून ४ लाख १८ हजार ५०० रुपयांची दंडाची वसुली केली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रत्येक स्थानकावर कारवाई करून जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १३ हजार ५४२ जणांवर कारवाई करून ३४ लाख ४ हजार ८३२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अशी केली दंडवसुली
स्थानक कारवाई दंड
झालेले (रुपये)
प्रवासी
कल्याण १, ३७९ ३,९०,९००
घाटकोपर १,१२१ २,००,०१८
कुर्ला ५१३ १,०१,८००
मानखुर्द ४६५ ७५,५००
वडाळा ३६६ ८०,७००
डोंबिवली ३६५ १,५९,०००
बदलापूर ३२८ ९५,२००
मुलुंड २१८ ४३,६००
दिवा १८८ ५४,३००
कर्जत १८५ ५१,४००
भायखळा १६१ २९,८००
कसारा १३४ ३९,०००


Web Title: General passengers traveling from Diyarbank can be fined Rs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.