राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. या दु:खद प्रसंगी पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज 'सिल्व्हर ओक'वर जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेत आहेत. आज देशातील नामवंत उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
४५ मिनिटांची सविस्तर चर्चा
गौतम अदानी यांनी मुंबईतील शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट केवळ औपचारिक नसून ती कौटुंबिक जिव्हाळ्याची होती. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या भेटीत अदानी यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच अपघाताबाबत सविस्तर माहिती घेत पवार कुटुंबाला धीर दिला.
गौतम अदानी आणि पवार कुटुंबाचे संबंध दशकांपासूनचे आहेत. अजित पवारांचे अदानींशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. काही काळापूर्वी बारामतीतील 'एआय सेंटर'च्या उद्घाटनावेळी सुप्रिया सुळे यांनी अदानींचे कौतुक करताना त्यांना 'मोठ्या भावाचा' दर्जा दिला होता. सुप्रिया सुळे यांनी नेहमीच नमूद केले आहे की, सुख-दु:खाच्या प्रसंगी अदानी पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजही बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, राज्याची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, त्या सध्या कामात व्यग्र आहेत. खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या मातोश्रींची भेट घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाल्या होत्या.
Web Summary : Gautam Adani visited Sharad Pawar at Silver Oak to offer condolences after Ajit Pawar's wife's demise. They discussed family ties and past memories. Adani’s long-standing relationship with the Pawar family was highlighted, emphasizing mutual support during difficult times.
Web Summary : गौतम अडानी ने अजित पवार की पत्नी के निधन पर शरद पवार से सिल्वर ओक में भेंट करके शोक व्यक्त किया। उन्होंने पारिवारिक संबंधों और पुरानी यादों पर चर्चा की। अडानी के पवार परिवार के साथ लंबे समय से चले आ रहे संबंधों पर प्रकाश डाला गया, जिसमें मुश्किल समय में आपसी समर्थन पर जोर दिया गया।