Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gauri Garje Case: पंकजा मुंडे यांचा माजी स्वीय सहायक अनंत गर्जेला जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:56 IST

पत्नी गौरी गर्जे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अनंत गर्जे यांच्यावर आहे. गर्जे याला नोव्हेंबर २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती.

मुंबई : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा माजी स्वीय सहायक अनंत गर्ने याला पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला.

न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करताना स्पष्ट केले की, आरोपीने या प्रकरणातील तथ्यांशी परिचित असलेल्या व्यक्तीला थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रलोभन, धमकी किंवा आश्वासन देऊ नये, जेणेकरून ते सत्य उघड करण्यापासून परावृत्त होतील. तसेच सूट मिळाल्याशिवाय सुनावणीस गैरहजर राहू नये.

गौरी पालवे मृत्यू प्रकरण काय आहे?

गर्जे याला नोव्हेंबर २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याची २८ वर्षीय पत्नी गौरी पालवे हिच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत अनंत गर्जे आणि त्याच्या दोन नातेवाइकांनी गौरीचा किरकोळ घरगुती कारणांवरून सतत छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

जामीन अर्जातील गर्जेचा युक्तिवाद

तपास यंत्रणेसमोर आत्मसमर्पण करून सहकार्य केले आहे. त्यामुळे आणखी कोठडीची गरज नाही. तसेच एफआयआरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठोस उल्लेख नाही.

एकही वैद्यकीय अहवाल, तक्रार किंवा साक्षीदाराची साक्ष अर्जदाराचा शारीरिक मारहाण किंवा क्रूरतेशी संबंध जोडत नाही. दुर्दैवी घटनेनंतरच्या भावनिक अवस्थेतून एफआयआर दाखल करण्यात आला. यापूर्वी गौरी किंवा तिच्या पालकांनी कधीही तक्रार केली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Pankaja Munde's Ex-Aide Anant Garje Granted Bail in Wife's Suicide Case

Web Summary : Anant Garje, ex-aide to Pankaja Munde, secured bail in his wife's suicide case. The court forbade him from influencing witnesses. Garje's wife's family alleged harassment. He argued lack of evidence linking him to the suicide.
टॅग्स :डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणपंकजा मुंडेन्यायालयघरगुती हिंसा