घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी जागा वाढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:00 AM2019-09-22T01:00:25+5:302019-09-22T01:00:35+5:30

सोमवारपासून सुरू होणार अंमलबजावणी; सुरक्षेवर अधिक भर

Gatkopar Metro Station will increase passenger space | घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी जागा वाढवणार

घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी जागा वाढवणार

Next

मुंबई : मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने (एमएमओपीएल) घाटकोपर स्थानकावर काही बदल करण्यात येणार असून या स्थानकावरील प्रवाशांसाठीची जागा दुप्पट करण्यात येणार आहे. सोमवारपासून हे बदल करण्यास येणार असल्याचे एमएमओपीएलकडून सांगण्यात आले. प्राधिकरणाने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट काउंटर्स, एफसी गेट्स आणि सुरक्षितता यांवर भर दिला.

मेट्रो कस्टमर केअर आणि सुरक्षा कर्मचारी करणार मदत
घाटकोपर मेट्रो स्टेशनवर सोमवारपासून प्रवाशांना नव्या रांग पद्धतीचा अनुभव घेता येईल. या बदलांची सहजपणे अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीप्रमाणेच मेट्रो कस्टमर केअर आणि सुरक्षा कर्मचारी उपलब्ध असतील.
प्रवाशांची संख्या आणि नव्या रांग पद्धतीवर मेट्रो अधिकाऱ्यांकडूनही लक्ष ठेवले जाणार आहे. प्रवाशांकडून आम्हाला नेहमीच सहकार्य मिळाले आणि त्यांच्या शिस्तबद्धतेमुळे हा बदलही सहजपणे लागू होईल याचा आम्हाला विश्वास वाटतो. या बदलांची सवय व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे या काळात प्रवाशांना संयम आणि सहकार्य करण्याचे आवाहन आहे, असे मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने सांगितले.

घाटकोपर मेट्रो स्थानकात करण्यात आलेले बदल (डावी बाजू)
मेट्रो स्टेशन कार्यालय हलवण्यात आले आहे. ते आता अन्यत्र उभारण्यात येईल.
रिटेल आऊटलेट्सही हलवण्यात आली आहेत. या आऊटलेट्सना अन्यत्र जागा दिली जाईल.
घाटकोपर रेल्वे स्टेशनकडून येताना उजव्या बाजूस केलेले बदल
मध्य रेल्वेचे तिकीट कार्यालय हलवण्यात येईल आणि स्कायवॉकजवळ उभारण्यात येईल. नव्या तिकीट कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आली आहे. या महिनाअखेर हे काम पूर्ण होईल.
प्रवाशांना वावरण्यासाठी जास्त जागा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने सुरक्षा तपासणी केंद्र मेट्रो स्टेशनच्या आत घेण्यात आली आहेत.
एएफसी (आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन्स) गेट्सची जागा ५० मीटरने पुढे ढकलण्यात आली आहे.
सुरक्षा तपासणी आणि सामान तपासणी यंत्रांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. तसेच एएफसी गेट्सही वाढवण्यात आली आहेत.

Web Title: Gatkopar Metro Station will increase passenger space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो