व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीकडून धमकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:01 IST2018-06-14T06:01:30+5:302018-06-14T06:01:30+5:30
एका औषध व्यवसायिकाला गँगस्टर रवी पुजारीकडून धमकीचे फोन आल्याचा प्रकार अंधेरीत बुधवारी उघडकीस आला. तसेच त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे या व्यवसायिकाने एका पत्राद्वारे पोलिसांना सांगितले.

व्यावसायिकाला गँगस्टर पुजारीकडून धमकी!
मुंबई - एका औषध व्यवसायिकाला गँगस्टर रवी पुजारीकडून धमकीचे फोन आल्याचा प्रकार अंधेरीत बुधवारी उघडकीस आला. तसेच त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे या व्यवसायिकाने एका पत्राद्वारे पोलिसांना सांगितले. त्यानुसार याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन चौकशी सुरू आहे.
प्रविण एच असे या व्यवसायिकाचे नाव आहे. जो कोकणमधील नामांकित व्यवसायिकांपैकी एक असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण यांना १५ दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख रवी पुजारी अशी सांगितली. तसेच प्रवीण यांच्याकडून २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. तेव्हा प्रवीण घाबरले आणि त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी एक लेखी तक्रारअर्ज दिला. तसेच आपल्या जीवाला धोका असुन पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात केली होती.
प्रवीण यांना आलेल्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग त्यांनी पोलिसांना ऐकविले. पोलिसांनी त्या आवाजाचे नमुने घेऊन ते पडताळणीसाठी पाठविले. ज्यात तो आवाज रवी पुजारीचाच असल्याचे उघड झाले. त्यानुसार याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आमच्याकडे आलेल्या तक्रार अर्जानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे.