गँगस्टर संभा काशीद पुन्हा गजाआड

By Admin | Updated: January 5, 2015 01:43 IST2015-01-05T01:43:51+5:302015-01-05T01:43:51+5:30

भांडुपमधल्या एका संंघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या गँगस्टर संभा काशीदला पुन्हा गजाआड करण्यात आले आहे. टेंभीपाडा येथील देशमुख चाळीतील घरांवर कब्जा मिळविण्यासाठी

Gangster Sambh Kashyad goes back and forth | गँगस्टर संभा काशीद पुन्हा गजाआड

गँगस्टर संभा काशीद पुन्हा गजाआड

मुंबई : भांडुपमधल्या एका संंघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या गँगस्टर संभा काशीदला पुन्हा गजाआड करण्यात आले आहे. टेंभीपाडा येथील देशमुख चाळीतील घरांवर कब्जा मिळविण्यासाठी काशीदने रहिवाशांना घातक शस्त्रांंच्या धाकात बेदम मारहाण केली. भलीमोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काशीदच्या अटकेने स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार भांडुप टेंभीपाडा येथील देशमुख चाळीत राहतात. याच परिसरात त्यांंच्या मालकीच्या तीन ते चार खोल्या आहेत. या खोल्यांत त्यांंचे भाडेकरू राहतात. या घरांवर कब्जा मिळविण्यास काशीद बंधंूनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चाळीवर सशस्त्र हल्ला चढविला. भाडेकरूंना शस्त्रांंचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. त्यांना घराबाहेर काढत घरांना टाळे ठोकले. याप्रकरणी तक्रारदाराने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती देताच भांडुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी संभा काशीदसह त्याचा भाऊ शहाजी याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
टेंभीपाडा परिसरात राहणाऱ्या सुरेश पगारे या तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यात भांडुप पोलिसांनी काशीदला अटक केली होती. या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या काशीदने पुन्हा दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gangster Sambh Kashyad goes back and forth