फर्निचरमधून नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
By मनोज गडनीस | Updated: December 21, 2023 18:00 IST2023-12-21T17:59:31+5:302023-12-21T18:00:32+5:30
तिघांना अटक, एनसीबीची कारवाई.

फर्निचरमधून नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक
मनोज गडनीस,मुंबई : मुंबईतुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्टीलच्या फर्निचरमध्ये नशा देणाऱ्या गोळ्या दडवत त्यांची ऑस्ट्रेलियामध्ये तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबईतील पथकाने पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे तीन कोटी रुपये आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही टोळी या नशेच्या गोळ्यांची तस्करी कुरियरच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांच्या चौकशी दरम्यान उघड झाले. कुरियरचे सामान चुकीचे घोषित करून त्याद्वारे ही तस्करी करण्यात येत होती. जप्त केलेल्या या विविध गोळ्यांचे एकूण वजन १८ किलोच्या आसपास आहेत. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.