Join us  

Ganesh Visarjan : 'पुढच्या वर्षी लवकर या', दिड दिवसाच्या बाप्पाला गणेशक्तांकडून निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 8:14 PM

मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे.  

मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! च्या जयघोषाने दिड दिवसाच्या पाहुण्या बाप्पा मुंबईसह संबंध महाराष्ट्रात वाजत - गाजत निरोप दिला जात आहे. आपल्या लाडक्या बाप्पा भावपूर्ण निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी घरगुती गणपतींच्या मिरवणुका फटाक्यांच्या आतषबाजीत आणि वाजत गाजत चौपाटी आणि जिथे जिथे कृत्रिम तलाव बनविण्यात आले आहेत, त्याठिकाणी चालल्या आहेत. मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे.  

नवी मुंबईत देखील दीड दिवशाच्या गणपती बाप्पांचे वाशी जागृतेश्वर तलावात विसर्जन करनयसाठी गणेश भक्तांची गर्दी झाली असून  डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधवांनी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान तारपानृत्य करून आनंद लुटाला आहे. मुंबईत दादर चौपाटी, जुहू आणि गिरगाव चौपाटीच्या दिशेने देखील घरगुती गणपती विसर्जनाच्या मिरणुका निघाल्या आहेत.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईनवी मुंबईमहाराष्ट्र