Ganesh Visarjan 2018 : भांडुपेश्वर तलावात बुडून एकाच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 19:24 IST2018-09-24T19:17:59+5:302018-09-24T19:24:53+5:30

यज्ञेश मळेकर असं या मयत तरुणाचे नाव आहे. तो इतर सहकाऱ्यांसह मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान तलावात उतरला होता.

Ganesh Visarjan 2018: young boy has died in bhandupeshwar lake | Ganesh Visarjan 2018 : भांडुपेश्वर तलावात बुडून एकाच मृत्यू 

Ganesh Visarjan 2018 : भांडुपेश्वर तलावात बुडून एकाच मृत्यू 

मुंबई -  गणेश विसर्जनादरम्यान मुंबई उपनगरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुपच्या भांडुपेश्वर तलावात गणपती विसर्जनास उतरलेला तरुण बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. यज्ञेश मळेकर असं या मयत तरुणाचे नाव आहे. तो इतर सहकाऱ्यांसह मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान तलावात उतरला होता. 14 फुटांपेक्षा खोल असलेल्या या तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. याचा एक व्हिडिओ ही समोर आला आहे. स्थानिकांनी त्याला बाहेर काढले आणि मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारास दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Web Title: Ganesh Visarjan 2018: young boy has died in bhandupeshwar lake