ईस्टर्नसाठी.....अंधश्रद्धा निर्मूलनासाठी गणेश मंडळाचा पुढाकार

By Admin | Updated: September 1, 2014 20:00 IST2014-09-01T20:00:32+5:302014-09-01T20:00:32+5:30

ईस्टर्नसाठी.....

Ganesh Mandal's initiative for eradication of superstition | ईस्टर्नसाठी.....अंधश्रद्धा निर्मूलनासाठी गणेश मंडळाचा पुढाकार

ईस्टर्नसाठी.....अंधश्रद्धा निर्मूलनासाठी गणेश मंडळाचा पुढाकार

्टर्नसाठी.....
फोटो मेलवर आहेत....
...............................................
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चांदिवली गणेश मंडळाचा पुढाकार
चांदिवली: पूर्व उपनगरांमध्ये सुरपरिचित असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. सद्गुरु आणि भोंदूबाबा यांच्यातील भेद सामान्यांनी जाणला पाहिजे, जेणेकरुन भोंदूबाबांच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाही, हा संदेश येथे दिला जात आहे. हा चलचित्र देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्त हजारोंच्या संख्येने दाखल होत आहेत.
अंधश्रद्धेसंदर्भातली जनजागृती करताना सद्गुरु आणि भोंदूबाबा यांच्यातील भेद स्पष्ट करणारा प्रबोधनात्मक असा चलचित्र देखावा चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने समर्थपणे उभारला आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून आई, वडिल त्यानंतर शिक्षकांच्या रुपाने माणसाला गुरु लाभतात. तर अध्यात्मिक मार्गावरुन जात असताना सद्गुरूंची भेट होते. पण काही लोक झटपट श्रीमंत होण्याच्या नादात भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकतात. काही ठिकाणी पैशांचा पाऊस पाडला जातो तर काही ठिकाणी चिमुरड्यांचा जीव दिला जातो. त्यामुळे भोंदूबाबांच्या भूलथापांना बळी पडता कामा नये, असा संदेश चलचित्र देखाव्यांच्या माध्यमातून अत्यंत समर्थपणे देण्यात मंडळाला यश आलेले आहे.
चांदिवलीतील स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कला दिग्दर्शक विकास शिंदे यांच्या संकल्पनेतून चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. सध्या मंडळाचे सुनील लाड, सुरेश जाधव, रामकृष्णन, अशोक काचळे, संजय नलावडे, संतोष रासम, सुहास शेट्ये, धर्मन रावत, रवींद्र नेवरेकर, प्रमोल हुले हे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सामाजिक संदेश देण्याची परंपरा चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ganesh Mandal's initiative for eradication of superstition