Join us  

Video: गडी एकटा निघाला..; शपथविधी सोहळ्यानंतर रोहित पवारांची भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:20 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडावर आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई - शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर, स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आता, उद्यापासून नव्याने मैदानात उतरणार असून लोकांमध्ये जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच, अजित पवारांच्या शपथविधीला आमचा पाठिंबा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, या घडामोडींवरुन आता आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता रोहित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडावर आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडावर भाष्य केल्यानंतर आता पवार कुटुंबातील इतर सदस्यही आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, आता आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण, शरद पवारांसोबत असल्याचे सांगताना ही वाट संघर्षाची आहे, पण थांबणार कोण नाही... असेही म्हटले आहे. 

रोहित पवार यांनी शरद पवारांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या चाहत्यांना साद घातली आहे. गडी एकटा निघाला... हे शरद पवारांवरील गाणं या व्हिडिओत ऐकायला मिळतं. त्याद्वारे आता रोहित पवारांनी भावनिक साद घातल्याचं दिसून येतंय. 

वाट आहे संघर्षाची...म्हणून थांबणार कोण?सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारादऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा...मग संघर्षाला घाबरतंय कोण?लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच...

सुप्रिया सुळेंच ट्विट

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आहे. यात शरद पवार  यांना, तुमच्यासाठी आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला, यावेळी पवार यांनी स्वत:चा हात वर करुन शरद पवार हे नाव घेताच टाळ्या सुरू झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी या पोस्टला ' ‘प्रेरणास्थान (Inspiration)' असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.   

टॅग्स :रोहित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई