FYJC Admission extended by four till July, and updated schedule | अकरावीच्या प्रवेशासाठी चार जुलैपर्यंत मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

अकरावीच्या प्रवेशासाठी चार जुलैपर्यंत मुदतवाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई : नव्याने लागू झालेल्या मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी भाग १ आणि २ नोंदणीचा कालावधी ४ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा/ मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन अर्जात बदल करण्याच्या सूचना तसेच सुधारित वेळापत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे.

कनिष्ठ आणि नामांकित महाविद्यालयातील ७० टक्के प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालये अकरावीचे नियमित वर्ग सुरू करू शकतात. तसेच एकत्र वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची असेल, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

वेळापत्रकात कनिष्ठ महाविद्यालये त्यांच्याकडील व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील जागा केव्हाही समर्पित करू शकतात. तर अल्पसंख्याक महाविद्यालये त्यांचा अल्पसंख्याक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर समर्पित करू शकतील.

असे आहे सुधारित वेळापत्रक
२९ जून ते ४ जुलै - सायंकाळी ५ वाजेपर्यंत
१. (सामान्य शाखेच्या कला, वाणिज्य, विज्ञान, एच. एस. व्ही. सी. शाखेसाठी - अ) - भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे.
- (ब ) भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे.
२. कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इनहाउस, अल्पसंख्याक) कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येतील. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश विहित वेळेत अपडेट करणे बंधनकारक आहे.
५ जुलै - संध्याकाळी ७ वाजता - सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
६ व ८ जुलै - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - त्रुटी व हरकतींवर आक्षेप संबंधित उपसंचालक कार्यालयात नोंदविणे.

पहिली फेरी
१२ जुलै - सायंकाळी ६ वाजता - पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.
१३ जुलै - सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत - पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
१५ जुलै व १६ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ३ - पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
१६ जुलै - सायंकाळी ७ वाजता - पहिल्या गुणवत्ता यादीची कटआॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा जाहीर.
१७ व १८ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे. आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.

दुसरी फेरी
२२ जुलै - सायंकाळी ६ वाजता - दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.
२३ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - दुसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
२४ व २५ जुलै - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत - दुसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
२५ जुलै - सायंकाळी ७ वाजता - दुसºया गुणवत्ता यादीची कटआॅफ व तिसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा जाहीर.
२७ व २९ जुलै - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.

तिसरी फेरी
१ आॅगस्ट - सायंकाळी ६ वाजता - तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.
२ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - तिसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
३ व ५ आॅगस्ट - सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत - तिसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
५ आॅगस्ट - सायंकाळी ७ वाजता - तिसºया गुणवत्ता यादीची कटआॅफ व विशेष गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा.

विशेष गुणवत्ता यादी
६ आॅगस्ट व ७ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - प्रवेशाचा भाग १
व भाग २ भरणे आणि आवश्यकता असल्यास भाग २ मध्ये बदल करणे.

९ आॅगस्ट - सायंकाळी ६ वाजता -
विशेष गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
.
१० व १३ आॅगस्ट - सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे.
१४ आॅगस्ट - सकाळी ११ वाजता - उपलब्ध रिक्त जागा प्रसिद्ध करणे.

विद्यार्थ्यांना दिलासा
अकरावी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘प्रथम येणाºयास प्राधान्य’ फेरीचे वेळापत्रक उपसंचालक कार्यालयाकडून नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: FYJC Admission extended by four till July, and updated schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.