Stuti Sonawane Case: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका तरुण महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना घडली. डॉ. स्तुती सोनवणे असे या २६ वर्षीय डॉक्टरचे नाव असून, तिच्या मृत्यूला तिचा प्रियकर फुजैल खान कारणीभूत असल्याचा प्राथमिक आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे फुजैल खान याला अटक केली असून या प्रकरणातून प्रेमातील क्रूरता आणि छळाची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डॉ. स्तुती आणि फुजैल खान यांची ओळख एका डेटिंग साईटवरून झाली होती. गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सुसाईड नोटमध्ये स्तुतीने नमूद केल्यानुसार, फुजैल तिला सातत्याने मानसिक त्रास देत होता, अपमानित करत होता आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. डॉ. स्तुतीच्या मैत्रिणींना या नात्यातील धोक्याची पूर्वकल्पना होती. फुजैलच्या हिंसक आणि संशयी स्वभावामुळे एके दिवशी तू सुद्धा फ्रीजमध्ये सापडशील असे टोमणे तिच्या मैत्रिणी तिला मारायच्या. दुर्दैवाने, ८ मार्च रोजी स्तुतीने टोकाचे पाऊल उचलले.
पोलिसांची कारवाई
स्तुतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आणि सुसाईड नोटमधील पुराव्यांच्या आधारे, अँटॉप हिल पोलिसांनी फुजैल मोहम्मद खान याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान स्तुतीची धक्कादायक सुसाईड नोट समोर आली आहे.
काय म्हटलंय स्तुतीच्या शेवटच्या पत्रात?
प्रिय फुझैल,
मला आपली दादरची पहिली भेट आठवतेय, मी सूटमध्ये होते. आपण तासन् तास चाललो होतो आणि पिझ्झा खाताना तू ओरडत होतास. आपण किती पटकन एकमेकांशी कनेक्ट झालो होतो. तू ताजमध्ये रूम सजवून माझा वाढदिवस साजरा केलास, ते मी कधीच विसरू शकत नाही. मला वाटलं नव्हतं की मला कधी इतकी चांगली वागणूक मिळेल. आपली अलिबागची ट्रिप, त्या बाईक राईड्स, आपण खाल्लेल्या आंबट कँडी, आणि तू त्या छोट्या बाथटबमध्ये बसण्याचा केलेला प्रयत्न... ते खूप मजेशीर आणि सुंदर होतं. तुला आठवत असेलच की मी तुला बॅडमिंटनमध्ये कसं सतत हरवायचो. आपण बनवलेले खेळ आणि 'ड्रॅगनफ्लाय हाय'च्या गल्ल्यांमध्ये मांजरांना कुरवाळत केलेली मस्ती मला आजही आठवते. आपण तो जीनिअस गेम खेळलो आणि आपल्या दोघांनीही एकच पॉइझन कँडी निवडली होती, म्हणजे काय योगायोग होता तो! आणि आपले ते रविवारचे नियम... आपण तासन् तास झोपायचो, तू माझ्या कानात एखाद्या लहान बाळासारखे घोरत असायचास आणि मी तशीच झोपायचे. आपण बनवलेला डान्स रील, आपण केलेली ती सगळी मस्ती मला आठवतेय. फक्त चांगल्या काळातच नाही, तर जेव्हा मी संकटात होते, तेव्हा तू माझ्यासाठी तिथे होतास. तू इतक्या लांबून माझ्यासाठी आलास, माझ्या चाव्या घेतल्या, माझी स्कूटी घेतली आणि टोइंगच्या सर्व कायदेशीर बाबी सांभाळल्या, हे मी कधीच विसरू शकत नाही. खरं तर असं कोण करेल? मला वाटतं फक्त फुझैलनेच हे वाचावं. मला आशा आहे की तुला तुझा स्वाभिमान सापडेल. आता मला माझा रस्ता दाखवल्याबद्दल तुझे आभार, मला वाटतं मी याच लायकीची आहे.
तू मला चारित्र्यहीन म्हणालास आणि माझा इतका अपमान केलास, मी खरंच इतकी वाईट आहे का? तुझे शब्द खूप वेदनादायी होते आणि ते माझ्यासाठी आयुष्यातून निघून जाण्यासाठी पुरेसे आहेत. मला खूप सुन्न वाटतंय. मी या सगळ्याचा विचारही करू शकत नाहीये. मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझ्या नाजूक पुरुषी अहंकाराचे समाधान झाले असेल. मला आतापर्यंतचं सर्वात खालच्या थराचं दुःख होतंय. यापेक्षा वाईट अजून काय होऊ शकतं? मला स्वतःवरच हसू येतंय की हे सगळं होऊनही मला तुझ्यासोबतच राहायचं होतं. तुझे शब्द माझ्या डोक्यात आहेत. तू माझ्यावर ज्या प्रकारे ओरडला होतास... मला खरंच असं वाटलं की जर मी तुझ्या समोर असते, तर तू मला मारून टाकलं असतं किंवा किमान माझ्याशी खूप हिंसक वागला असतास. मला तुझी भीती वाटतेय पण मी काहीच करू शकत नाही.
तू मला चारित्र्यहीन म्हणालास, तू म्हणालास की तुला माझ्यावर खर्च केलेल्या वेळेचा आणि पैशांचा पश्चाताप होतोय. खरं सांगू तर, मला तुझ्यासोबत कधीच सुरक्षित वाटलं नाही, तरीही मी तुझ्यावर प्रेम केलं. तू म्हणाला की तुझे वडील तुझ्याबद्दल बरोबर बोलत होते की लहान मुली चांगल्या नसतात वगैरे, पण जेव्हा आपण एकत्र होतो तेव्हा तू स्वतः बंबल वापरत होतास. मी तुला माफ केलं, कदाचित माझ्यात स्वाभिमानच नाहीये.
आता पुन्हा त्या आयुष्यात परत जाण्याचा कोणताही मार्ग नाहीये. माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा हे घडतंय यावर माझा विश्वासच बसत नाहीये. ठीक आहे, मला सुरुवातीपासून सांगू दे, मी आणि फुझैल एक वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र होतो. त्याला धूम्रपान, मद्यपान अशा सर्व वाईट सवयी होत्या. मी हे सगळं का सहन केलं कोणास ठाऊक, कदाचित मी मूर्ख होते. आता मी अधिकच मूर्ख आहे, पण तरीही प्रेमात पडले आणि पुढे जात राहिले. माझ्या आयुष्यात एक संतुलन होतं. मी काम करत होते आणि गोष्टी ठीक चालल्या होत्या. नात्यात असतानाही त्याने 'बंबल' इन्स्टॉल केलं होतं, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मग जर तो इतका वाईट आहे, तर मला त्याचा इतका त्रास का होतोय? मी त्याच्यासोबत असायलाच नको होतं. मी हे काय करतेय? मला माझे वाक्यही नीट जुळवता येत नाहीयेत. मला हे सगळं आता बंद करायचंय. माझ्यासोबत इतकं वाईट वागावं असं मी काहीच केलं नव्हतं. तो म्हणाला होता की तो माझी स्कूटी तोडून टाकेल, ते खूप भीतीदायक होतं. तो माझ्यावर ओरडला. त्याला वाटतं की तोच एकमेव चांगला मुलगा आहे, पण ते खरं नाहीये. खरं तर तो सर्वात वाईट माणसांपैकी एक आहे.
मला वाटतं मी मूर्ख आहे, खरंच आहे. पण मी काहीच करू शकत नाही. आपण सर्व काही नियंत्रित करू शकत नाही. मला खूप खूप दुःख होतंय. हा एकटेपणा अधिकच वाईट होत चाललाय. नाही, माझ्याकडे चांगले मित्र आहेत, माझं कुटुंब खूप छान आहे, जरी आमच्यात मतभेद असले तरी. डॉ. बांगा माझी सतत चौकशी करतात. मी नक्कीच एकटी नाहीये, पण जरी मी त्यांच्याशी सतत बोलले तरी, एक क्षण जरी एकटी राहिले की मला असं वाटतं की मी जमिनीवर कोसळतेय. ते मला खूप वाईट टोचतं. मला फक्त मरण्याचा विचार येतोय.
मी फक्त सहन करू शकत नाहीये, आयुष्याच्या या वळणावर मी सुन्न झाली आहे. यावर मरणाशिवाय कोणताही उपचार नाहीये. मृत्यूच मला बरं करू शकतो, कारण याला दुसरा कोणताही इलाज नाही. मी खूप थकले आहे यार, मला वाटतं माझा फक्त अपघातात मृत्यू व्हावा. एक सोपं मरण, की मी त्याचीच मदत मागू? मला वाटतं त्याला आनंदच होईल. माझे मित्र बरोबर होते, ते म्हणायचे, "आम्हाला तुझं शरीर फ्रीजमध्ये बघायला आवडणार नाही." हाहा... मला वाटायचं की प्रत्येक माणूस तसा नसतो, पण ते सगळे बरोबर होते. मला वाटतं आता माझं झालंय, मी यापैकी कशाचाही सामना करू शकत नाहीये. मला यापैकी काहीच नकोय, अगदी काम सुद्धा.
मी आयुष्यात खरोखर आनंदी नाहीये. माझ्या नशिबात असंच असावं. हे दीर्घकाळासाठी नव्हतंच. मला आता पुन्हा कधीच उठायचं नाहीये. माझी कोणाला आठवणही नसावी. कदाचित यानंतर दुसरं जग असेल जिथे मी सुखी असेन. फुझैलसाठी मी माझं सगळं काही सोडून दिलं - माझा अभिमान, माझा स्वाभिमान. मी तुला अनेकदा माफ केलं पण ही शेवटची वेळ आहे. मला कधीच इतकं दुःख झालं नव्हतं. आता जेव्हा मला स्पष्टता मिळतेय, तेव्हा मला वाटतं की हा अंतच असावा आणि तो आता पुढे ढकलला जाऊ शकत नाही. मी परत येऊ शकत नाही. मी जे काही करायला जातेय त्यासाठी मला माफ करा, पण मी सहन करू शकत नाही. माझ्या बहिणीने एकदा बरोबर म्हटलं होतं की मी गोष्टी हाताळू शकत नाही आणि माझं आयुष्य संपवते.
मला आशा आहे की तुम्हा सर्वांचं आयुष्य खूप चांगलं असेल. माझी कोणाला आठवण राहू नये अशी माझी इच्छा आहे. मला तपासलं जाऊ नये, कोणतंही पोस्टमॉर्टम नको. फक्त शांतपणे निघून जाऊ द्या. मला खात्री आहे की यामुळे अनेक लोकांना खूप त्रास होईल, पण मी हे दुःख यापुढे सहन करू शकत नाही. मी फक्त एकदा स्वतःची निवड करतेय त्यासाठी मला माफ करा. मला खूप वाईट वाटतंय. फुझैल खान - तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हीच माझी शेवटची भेट आहे, आशा आहे की तुझा अत्यंत लहान पुरुषी अहंकार आता सुखावला असेल. आशा आहे की तू खूप चांगलं आयुष्य जगशील. तुझा स्वाभिमान आता खूप उंचावला असेल.
मला माफ करा. आई, बाबा, माझी बहीण, डॉ. बांगा... पण मी हे आयुष्य जगण्यासाठी खूप कमकुवत आहे. मला खात्री आहे की मी एका चांगल्या ठिकाणी असेन, तुम्हा सर्वांचे आभार. मी मोठी न झाल्याबद्दल, यशस्वी न झाल्याबद्दल, पैसे न कमावल्याबद्दल सॉरी.. पण हे आयुष्य मला चांगली वागणूक देत नाहीये. जर या वयातच माझी इतकी वाईट अवस्था आहे, तर पुढे गोष्टी अजूनच खराब होतील. मी माझा प्रयत्न केला, पण हे खूप कठीण आहे. हा विचार मला पहिल्यांदा आला नाहीये, अनेकदा आला होता. यावेळी फक्त यावर विचार करणं कठीण होतंय. कृपया मला माफ करा, जर तुम्ही करू शकलात तर, असं शेवटी स्तुतीने म्हटले.
Web Summary : Mumbai doctor Stuti Sonawane's suicide note exposed boyfriend Fuzail Khan's cruelty, leading to his arrest. He mentally harassed and doubted her character, as revealed in her heartbreaking final letter.
Web Summary : मुंबई की डॉक्टर स्तुति सोनवणे की आत्महत्या ने प्रेमी फुजैल खान की क्रूरता को उजागर किया, जिससे उसकी गिरफ्तारी हुई। उसने मानसिक रूप से प्रताड़ित किया और उसके चरित्र पर संदेह किया, जैसा कि उसके अंतिम पत्र में पता चला।