Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंढवा प्रकरणी खारगे समितीचा अहवाल वाचूनच पुढील कारवाई; बावनकुळेंनी केले स्पष्ट; पार्थ पवारला क्लिन चीट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 05:29 IST

पुढच्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन आहे. त्यामुळे समितीचा अहवाल प्रलंबित ठेवता येणार नाही.

मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी खारगे चौकशी समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लीनचीट दिल्याची चर्चा असली तरी सीलबंद अहवालाचे वाचन केल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुढच्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन आहे. त्यामुळे समितीचा अहवाल प्रलंबित ठेवता येणार नाही.

अहवाल मंगळवारी माझ्याकडे आला असून, त्याचे सविस्तर परीक्षण करण्यासाठी दोन-तीन दिवस लागतील. माध्यमांतील बातम्यांवर आधारित निष्कर्ष काढणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

English
हिंदी सारांश
Web Title : Mundhwa Land Case: Action after reading Kharge report, says Bawankule.

Web Summary : Revenue Minister Bawankule stated action on the Mundhwa land case will follow a thorough review of the Kharge committee report. A decision will be made after consulting the Chief Minister, dismissing media speculation about a clean chit.
टॅग्स :पार्थ पवार