Join us

राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्यासाठी कार्यकर्त्यांचे कायसिद्धी हवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:40 IST

बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील आदी गणेश मंदिरात भाजपा कार्यकर्ते अमित व्यास  यांनी या कार्यसिद्धी हवनाचे आयोजन केले होते.

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसतांना राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होऊन पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आज सकाळी बोरिवलीत कार्यसिद्धी हवन करण्यात आले.

बोरिवली पश्चिम साईबाबा नगर येथील आदी गणेश मंदिरात भाजपा कार्यकर्ते अमित व्यास  यांनी या कार्यसिद्धी हवनाचे आयोजन केले होते. एकूण 4 ब्राह्मणांनी सुमारे साडेतीन तास मंत्रघोषात संकल्प सोडत सदर हवन केले.व्यास हे स्वतः हवनाला बसले होते. माजी आमदार हेमेन्द्र मेहता, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, नगरसेविका लीना दरेकर, नगरसेवक जितेंद्र पटेल आणि उत्तर मुंबईतील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीस