Friendship band formed by children of Sex workers | देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड
देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांनी झाडांना बांधले फ्रेण्डशिप बॅण्ड

मुंबई  : सोशल अ‍ॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई संस्था आणि ग्रीन स्काय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रेण्डशिप डे’ दिनाचे औचित्य साधून देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांनी नुकताच झाडांसोबत ‘मैत्री दिवस’ साजरा केला. भायखळा पश्चिमकेडील महापालिका शाळा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी साई संस्थेच्या मुलांनी छोट्या रोपांना फ्रेण्डशिप बॅण्ड बांधून त्याचे रोपण केले.
२० झाडांना प्रत्येकी २० मुलांनी फ्रेण्डशिप बॅण्ड बांधले असून त्या झाडांची जिवलग मित्रासारखी काळजी घेण्याची शपथ या वेळी मुलांनी घेतली. साई संस्था देहविक्रय करणाºया महिला व त्यांच्या मुलांसाठी कार्य करते. निसर्ग संवर्धनासाठी मुलांना प्रोत्साहित करणे हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता, असे साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी सांगितले.


Web Title:  Friendship band formed by children of Sex workers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.