मॉडेलला मारहाण करणारा मित्र अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:34 AM2019-07-19T05:34:41+5:302019-07-19T05:34:50+5:30

मॉडेलला मारहाण करत तिचा विनयभंग करणाऱ्या मित्राला बुधवारी अटक करण्यात आली.

A friend trying to attack the assailant | मॉडेलला मारहाण करणारा मित्र अटकेत

मॉडेलला मारहाण करणारा मित्र अटकेत

Next

मुंबई : मॉडेलला मारहाण करत तिचा विनयभंग करणाऱ्या मित्राला बुधवारी अटक करण्यात आली. साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या सात महिन्यांत त्याने दोन वेळा तिच्यावर हल्ला केल्याचा तिचा आरोप आहे. या प्रकरणी विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला.
झोएब खान (२५) याला वर्सोवा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. खान याने सात महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारे या मॉडेलला मारहाण केली होती. त्यानुसार त्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपपत्र तयार केले. ८ जुलैला साकीनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये ते दोघे जेवायला एकत्र गेले होते. तेव्हा काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि खानने तिला मारहाण केली.
८ जुलैला याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र अटक टाळण्यासाठी त्याच्या एका मित्राच्या घरी तो लपून बसला होता. त्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरम्यान, तो वर्सोवा परिसरात फिरत असल्याची माहिती चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानसुार त्यांनी तेथे जाऊन झोएबला अटक केली.
।मॉडेल आणि खान हे एकत्र राहतात. शिवाय ते चांगले मित्र आहेत. मात्र खान तिला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप तिने पोलिसांत दाखल तक्रारीत केला आहे.

Web Title: A friend trying to attack the assailant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक