Payal Tadvi Case: आरोपींविरोधात आठवड्यात दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 06:01 AM2019-07-17T06:01:44+5:302019-07-17T06:01:51+5:30

डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, २२ जुलैपर्यंत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, अशी माहिती तपासयंत्रणेने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

Friday chargesheet against accused | Payal Tadvi Case: आरोपींविरोधात आठवड्यात दोषारोपपत्र

Payal Tadvi Case: आरोपींविरोधात आठवड्यात दोषारोपपत्र

Next

मुंबई : डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, २२ जुलैपर्यंत आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, अशी माहिती तपासयंत्रणेने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. हेमा अहुजा, भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्या. दमा शेशाद्री नायडू यांच्यापुढे या अर्जावर सुनावणी होती.
मंगळवारच्या सुनावणीत सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, एका आठवडयातच आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करू, असे न्या. नायडू यांना सांगितले. दरम्यान, पायलच्या कुटुंबीयांच्या वतीने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे मुदत मागितली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत, आरोपींच्या जामीन अर्जावर २३ जुलै रोजी सुनावणी ठेवली.
२२ मे रोजी पायलने नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी पायलच्या मोबाइलमधून सुसाइड नोटचा फोटो फॉरेन्सिक लॅबच्या हाती लागला. या सुसाइड नोटमध्ये तिने आपल्या आत्महत्येला आरोपी डॉक्टरांना जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Friday chargesheet against accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.