अवाजवी मालवाहतूक करणे साडेचार हजार चालकांना भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:01 AM2019-11-16T06:01:05+5:302019-11-16T06:01:14+5:30

भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे वाहनचालकांना महागात पडले असून राज्यात सहा महिन्यांमध्ये ४६०४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

The freight was haunted by around 5,000 passengers | अवाजवी मालवाहतूक करणे साडेचार हजार चालकांना भोवले

अवाजवी मालवाहतूक करणे साडेचार हजार चालकांना भोवले

Next

मुंबई : भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे वाहनचालकांना महागात पडले असून राज्यात सहा महिन्यांमध्ये ४६०४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून १२ कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
जास्त प्रमाणात मालवाहतूक केल्यामुळे वाहनांच्या ब्रेक सिस्टीममध्ये बिघाड होऊन अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी परिवहन विभागाने मालवाहू वाहनातून माल वाहतूक करण्यासाठी भारक्षमता निश्चित केली आहे. परंतु अनेक वाहनचालक भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांविरोधात परिवहन विभागाने मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार परिवहन विभागाने एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत कारवाई केली. यामध्ये ५५,७५९ वाहने तपासण्यात आली, त्यात ४६०४ वाहने दोषी आढळली, तर ४२१२ वाहनांवर कारवाई करून सोडण्यात आले. २५१६ वाहने जप्त करण्यात आली असून ३६९७ वाहनांमधील माल उतरवून ती वाहने सोडण्यात आली. या करण्यात आलेल्या कारवाईतून परिवहन विभागाने १२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
>पुणे विभाग आघाडीवर : भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करण्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभागात केलेल्या कारवाईत पुण्यातून २४७, सोलापूर ३१, बारामती १८०, पिंपरी-चिंचवड ५०७, अकलूज १४३ अशी एकूण ३७०४ वाहने दोषी आढळली आहेत. या प्रकरणी तीन कोटी १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विभाग तपासलेली वाहने दोषी वाहने एकूण दंडवसुली
मुंबई ७८४८ १३७ ३५,१४,०००
ठाणे ९३४६ ८३५ १,१७,४८,०००
पनवेल ३१०९ ३४२ २,०८,२८,०००
कोल्हापूर २६९१ ६२६ १,३५,६८,०००
पुणे ३७०४ १०२८ ३,१६,४५,०००
नाशिक २६२४ ६५ १६,७१,०००
धुळे १७३८२ ९० २८,५९,०००
औरंगाबाद २५१९ ५२९ ७९,३३,०००
नांदेड २३५६ ९२ १९,५९,०००
लातूर ५९९ ९२ २५,२३,०००
अमरावती १३१५ १३४ ३२,८,०००
नागपूर शहर ७६० २९४ १,०२,७,०००
नागपूर ग्रामीण १४०६ ३४० ८९,१३,०००

Web Title: The freight was haunted by around 5,000 passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.