'Freedom of speech is more important than reputation' | ‘भाषण स्वातंत्र्य प्रतिष्ठेपेक्षा अधिक मोलाचे’
‘भाषण स्वातंत्र्य प्रतिष्ठेपेक्षा अधिक मोलाचे’

मुंबई : भाषण स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक मोलाचे आहे, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने पॅराशूट तेलाच्या गुणवत्तेवर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिजीत भन्साली आणि मॅरिको लि. यांना आपापसांत वाद सोडविण्याचे निर्देश दिले.
पॅराशूट तेल विकत घेऊ नका, असे सामान्यांना यूट्यूबद्वारे आवाहन करणाºया अभिजीतला उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने ही पोस्ट मागे घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला अभिजीतने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे आव्हान दिले. या अपिलावरील सुनावणीत मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व भारती डांगरे यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदविले.
घटनेने बहाल केलेल्या भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून कोणतीही व्यक्ती दुसºया व्यक्तीची किंवा कंपनीच्या उत्पादकांची बदनामी करू शकत नाही. सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागावे, असे निरीक्षण एकसदस्यीय खंडपीठाने नोंदविले होते.
प्रतिष्ठा जपणे आणि भाषण स्वातंत्र्य हे दोन्ही जरी मूलभूत अधिकार असले, तरी भाषण स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. मानहानीबाबत अस्तित्वात असलेल्या कायद्यांतर्गत कोणीही वस्तुस्थितीबाबत खोटे विधान करू शकत नाही. मत हे कितीही वाईट असले, तरी तेच तथ्य आहे, हे गृहीत धरू शकत नाही. सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या व्यक्तींची काही कर्तव्ये असली, तरी भाषण स्वातंत्र्य हे प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. या अपिलावरील सुनावणी घेताना आम्हाला या मुद्द्यावर विचार करावा लागेल, न्यायालयाने म्हटले.

पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढावा - हायकोर्ट
सर्व पक्षांनी एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढा. वादग्रस्त व्हिडीओमध्ये जे आक्षेपार्ह आहे, ते याचिकाकर्ते त्यांच्या व्हिडीओमधून हटवू शकतात, असे न्यायालयाने म्हटले. अधुनिक युगातील सोशल मीडियावर प्रभाव असलेले समाजाचे वास्तव आहे आणि त्यांचे अनुयायी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीही आहे, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले.

Web Title: 'Freedom of speech is more important than reputation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.