Join us

२४४ ठिकाणी कोविडची मोफत चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 16:58 IST

Corona News : कोविडवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य...

मुंबई : महापालिकेच्या अखत्यारीतील दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी २ नोव्हेंबरपासून मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध होत आहे. या सुविधेमुळे चाचणीची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली आहे. परिणामी मुंबईकरांना आपल्या घरालगतच्या परिसरात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुलभतेने व मोफत करवून घेता येणे शक्य होणार आहे.

कोविडवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे, यासाठी सर्वस्तरीय उपाययोजना केल्या जात आहेत. या योजनांचा भाग म्हणून कोविडविषयक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा वॉक इन पद्धतीने उपलब्ध आहे. काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजन आधारित चाचणी उपलब्ध आहे.

५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासून चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील २४४ ठिकाणे, ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा, या व्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्येही कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध आहे. चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होण्यासोबतच वेळेत निदान होण्यासही मदत होणार आहे.

------------------

- २४ विभागांमध्ये २४४ ठिकाणी चाचणी उपलब्ध आहे.- ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या क्रमांकाद्वारेही उपलब्ध आहे.- याचबरोबर संकेतस्थळावर ही माहिती आहे.- यामुळे रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती, ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होईल.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबईमुंबई महानगरपालिका