गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:27 IST2025-07-26T13:26:51+5:302025-07-26T13:27:20+5:30

शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना यंदाही मोफत शाडू माती पुरविली आहे.

Free distribution of 910 tons of Shadu clay to Ganesh sculptors | गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण 

गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण 

मुंबई : शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना यंदाही मोफत शाडू माती पुरविली आहे. प्रत्येक परिमंडळात १०० टन शाडू माती आवश्यकतेप्रमाणे मूर्तिकारांना देण्यात येत असून आतापर्यंत एकूण ९१० टन मातीचे वितरण केले आहे. 

पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या ९९३ मूर्तिकारांना मंडप परवानगी दिली आहे. ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी पालिकेच्या संकेतस्थळावर  मागणी नोंदवावी, असे आवाहन उपायुक्त (परिमंडळ २) तसेच गणेशोत्सवासाठीचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

२०२४ मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना मिळून ५०० टन इतकी माती मोफत देण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी एप्रिल २०२५ पासूनच मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीची मागणी केली केली होती. सर्वाधिक ९६ टन ६१५ किलो शाडू मातीचे वितरण ‘के पूर्व’ विभागात झाले आहे. त्यापाठोपाठ ‘जी उत्तर’मध्ये ९१ टन २० किलो, ‘पी उत्तर’ विभागात ८२ टन ४५५ किलो, ‘डी’मध्ये ७४ टन २०० किलो; तर ‘एफ दक्षिण’मध्ये ७२ टन ६०० किलो माती वाटपाची नोंद झाली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मंडप परवानगी घेणाऱ्या मूर्तिकारांमध्ये आर दक्षिण विभागातून १३९, के पश्चिममध्ये ९०, पी उत्तरमध्ये ७४, पी दक्षिणमधून ७२ जणांचा समावेश आहे.

Web Title: Free distribution of 910 tons of Shadu clay to Ganesh sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.