Fraud in the name of actor Sonu Sood | अभिनेता सोनू सूदच्या नावाने फसवणूक

अभिनेता सोनू सूदच्या नावाने फसवणूक

मुंबई : अभिनेता सोनू सूद याच्या नावाने आर्थिक मदत देण्याच्या नावे फसवणूक करण्याचा प्रकार जोगेश्वरीत घडला. विशाल लांबा असे तक्रारदाराचे नाव असून ते सूदचा निकटवर्तीय समजला जातो. त्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीने त्यांना फोन करत तो सोनू सूदचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. तसेच सूदकडून आर्थिक मदत हवी असल्यास त्यासाठी १७०० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असे सांगण्यात आले. ही बाब खरी वाटल्याने लांबा यांनी त्याला पैसे पाठविले. मात्र नंतर पुन्हा फोन केल्यावर त्याने फोनच उचलणे बंद केले.

एका महिलेला आजारी आईसाठी रुग्णवाहिकेची गरज होती, तेव्हा तिच्याकडून ८ ते १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र तिला रुग्णवाहिका न पुरविण्यात आल्याने आईचा मृत्यू झाला. याबाबत सूद याने सोशल मीडियावर पोस्ट करत अशी फसवणूक करू नका, अशी विनंतीदेखील केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fraud in the name of actor Sonu Sood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.